जाहिरात
2 months ago

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी ही होवू शकते. हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणूका पार पडल्या आहेत. त्याचे एक्झिट पोलही समोर आले आहे. त्यात हरियाणात काँग्रेसचे सरकार होताना दिसत आहे. तर जम्मू काश्मिरमध्ये इंडिया आघाडी बहूमताच्या आसपास आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या निवडणुकीवर भाजपला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे राज्या मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. 
 

सांगलीतील जतमध्ये भूमिपुत्र विरुद्ध आयात उमेदवार वाद पेटला, बैठकीत राडा

सांगलीतील जतमध्ये भूमिपुत्र विरुद्ध आयात उमेदवार वाद पेटला. भूमिपुत्र मुद्यावरुन भाजपाच्या बूथ कमिटी बैठकीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजप नेते तमनगौडा रवी पाटलांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भाजपा पक्ष निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या समोरच व्यासपीठावर घडला प्रकार. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ कमिटी बैठकीत वादावादी आणि गोंधळ.. भाजपा माजी सभापती तमानगौडा रवी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भूमिपुत्र उमेदवार द्या, अशी घोषणाबाजी केल्यावर आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी आक्षेप घेतल्याने घडला प्रकार.

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर प्रवासी बसला आग

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर वाघजाई मंदिराकडून खाली उताराला प्रवासी बसला आग लागली आहे. आयआरबी पेट्रोलिंगकडून फायर ब्रिगेड स्पॉटवर रवाना. प्रवाशांना सुखरुप बाहेर काढल्याची प्राथमिक माहिती मात्र आगीचे कारण समजलं नाही.

हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र शरद पवार गटात सक्रीय

हर्षवर्धन पाटील उद्या तुतारी हातात घेणार आहेत. त्याआधी त्यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील युगेंद्र पवारांसोबत कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच कार्यक्रमाला गेल्यानंतर युगेंद्र पवारांना राजवर्धन पाटील यांनी उद्या पक्ष प्रवेशासाठी आपण देखील यावं असं आमंत्रण दिलं. पक्षप्रवेश होण्याआधीच राजवर्धन पाटील पक्षाच्या कार्यात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर 

पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार

राज ठाकरे घेणार पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा 

निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार ,प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत साधणार संवाद 

पुणे ,सातारा ,सांगली ,सोलापूर ,कोल्हापूर, नगर इथले पदाधिकारी पुण्यात बैठकीसाठी राहणार उपस्थित

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड

दिल्लीतील अखिल  भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. साहित्य महामंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. हे साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे. 

राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट

भाजपा नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांनी रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय.अंतरवाली सराटी गावात सरपंच यांच्या शेतात असलेल्या घरी जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय. रात्रीच्या आंधारात ही गुपचूप भेट घेतली. 

अजित पवारांना आणखी एक झटका लागणार? बडा नेता करणार घर वापसी

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. यापूर्वी फलटणच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. अजित पवार गटातील रामराजे नाईक निंबाळकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.  फलटण येते त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. 

सिल्लोड येथे मंत्री अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्यांची महिलांनी केली होळी

एकनाथ शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदार संघात साड्या वाटल्या होत्या. मात्र या साड्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन जाळल्या आहेत. साड्या जळणारे लोक हे बोगस होते असे सत्तार यांनी सांगितलं आहे. 

डोंबिवलीत शिंदें गटाला दणका, युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे ठाकरे गटात प्रवेश करणार

दीपेश म्हात्रे शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण सोडून ठाकरेंची मशाल हाती घेणार आहेत. दीपेश म्हात्रे आपल्यासोबत कल्याण डोंबिवली महापालिकेमधील चार माजी नगरसेवकांसह आणि पदाधिकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. 

'एकनाथ शिंदेंना परिणाम भोगावे लागतील', आमदार फोडीवर बच्चू कडू भडकले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमच्यावर एक घाव केलाय, पण आम्ही हजारो घाव देऊ असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या पक्षाचे आमदार  राजकुमार पटेल यांना गळाला लावले आहे. शिंदेंनी एक खेळी केली आहे, आम्ही दहा खेळ्या खेळू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. 

शरद पवारांच्या पुण्यातील घरा बाहेर निष्ठावंतांचा ठिय्या

शरद पवारांच्या पुण्यातील घरा बाहेर पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते एकवटले आहेत. त्यांनी घरा बाहेरच ठिय्या आंदोलन केले आहे.  भंडारा जिल्ह्यात आयात उमेदवार नको निष्ठावंतना संधी द्या" या मागणीसाठी हे कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करत आहेत. भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघ स्थानिक कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी केली आहे. 

चेंबूरमध्ये भीषण आग, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलोनीत मोठी आग लागली आहे. यात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण जखमी ही झाले आहेत. त्यांना घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये एका 7 वर्षीय मुलीचा आणि 10 वर्षीय मुलाचा समावेश आहे. पहाटे 4:30 ते 5:00 च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. 

रत्नागिरीत ठाकरे गटाला खिंडार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिंदेंच्या सेनेत

रत्नागिरीत शिवसेना उबाठाला खिंडार पडलं आहे. शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी ठाकरे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आबा घोसाळे यांनी शिवसेनेची पहिली ग्रामपंचायत रत्नागिरीत निवडून आणली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. येत्या विधानसभेला उदय सामंत यांना प्रचंड मताने निवडून आणणार, असा विश्वास आबा घोसाळे यांनी व्यक्त केला.

लातूरच्या पुरणमल लाहोटी वसतिगृहातील 30 मुलींना विषबाधा

लातूरच्या पुरणमल लाहोटी मुलींच्या वसतिगृहात तीस विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाली आहे. रात्रीच्या जेवणात सरडा आढळून आला आहे. त्यामुळे वसतिगृहातील मुलींना विषबाधा झाली आहे. सर्व बाधित मुलींना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझू आजपासून 5 दिवस भारत दौऱ्यावर

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझू आजपासून 5 दिवस भारत दौऱ्यावर येत आहे. हा दौरा महत्वाचा समजला जात आहे. मालदीव बरोबर भारताचे संबध चांगले राहीले आहेत. ते अजून भक्कम होण्यासाठी हा दौरा महत्वाचा समजला जात आहे. 

'चला अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला' आंदोलनाला सुरुवात

अरही समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजी राजे आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी चला अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला हे आंदोलन छेडले आहे. त्यासाठी त्यांचे कार्यकर्ते मुंबईत धडकणार आहेत. पुण्याच्या स्वराज्य भवन येथुन संभाजीराजे शेकडो वाहनांसह मुंबईत धडकतील. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com