जाहिरात

Crime news: फेसबूकवरून प्रेम, ब्लॅकमेल करत लग्न,'त्या' एका व्हिडीओनं आयुष्य खराब झालं, पुढे...

तरुणीला काही वर्षांपूर्वी फेसबुकवर एका तरुणाची ओळख झाली. या ओळखीतून झालेल्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यांच्या गाठीभेटीही वाढल्या.

Crime news: फेसबूकवरून प्रेम, ब्लॅकमेल करत लग्न,'त्या' एका व्हिडीओनं आयुष्य खराब झालं, पुढे...
उल्हासनगर:

निनाद करमरकर

उल्हासनगरात एका तरुणीची एका तरुणासोबत फेसबुकवर ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झालं. पुढे दोघांमध्ये शारीरिक संबध प्रस्थापित झाले. मात्र तरुणाने त्यांच्यातल्या या नाजूक क्षणांचा व्हिडीओ तयार केला. याचा तिला पत्ताच लागला नाही. पुढे त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. त्यातून तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत लग्न ही केलं. इथं हे सर्व थांबलं नाही. तर पुढे ही तिच्या नशिबी वाईट दिवसच होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लग्नानंतर तिला माहेरुन पैसे आणण्यासाठी दबाव टाकला जावू लागला. त्यासाठी तिला  अक्षरशः सिगारेटचे चटके ही देण्यात आले. याप्रकरणी या तरुणीच्या तक्रारीवरून पतीविरोधात बलात्काराचा, तर सासरच्या मंडळींविरोधात शारीरिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणी बरोबर हे सर्व घडलं आहे. या तरुणीला काही वर्षांपूर्वी फेसबुकवर एका तरुणाची ओळख झाली. या ओळखीतून झालेल्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.  त्यांच्या गाठीभेटीही वाढल्या. एकदा या दोघांमधील नाजूक क्षणाचं प्रियकराने मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं.  तो व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करत तिच्याशी मनाविरुद्ध लग्न केलं. लग्नानंतरही अत्याचाराची ही कहाणी थांबली नाही. 

ट्रेंडिंग बातमी - Crime news: रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवले, 17 जणांकडून 1 कोटी उकळले, शिंदेंच्या शहराध्यक्षाने हे काय केले?

तिला माहेरून पैसे आणि विविध वस्तू आणण्यासाठी सासरच्यांनी छळायला सुरुवात केली. काही वेळा माहेरच्यांनी या मागण्या पूर्ण देखील केल्या. मात्र त्यामुळे सासरच्या मंडळींची हाव आणखीनच वाढली. त्यातूनच अक्षरशः तिला सिगारेटचे चटके देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. अखेर हा सगळा छळ असह्य झाल्याने या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्यामुळे तिने न्यायालयात खासगी केस दाखल केली. 

ट्रेंडिंग बातमी - Ladki behan yojana: लाडक्या बहीणींना 26 जानेवारीला हफ्ता मिळणार, खात्यात 1500 की 2100 जमा होणार?

न्यायालयाने या प्रकरणात पती आणि सासरच्या मंडळीं विरोधात बलात्कार, मारहाण आणि शारीरिक छळाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मात्र विठ्ठलवाडी पोलिसांनी या तरुणीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसंच तिच्या पतीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली असून दुसरीकडे तरुणीने दाखवलेल्या या धाडसाचं कौतुक होतंय.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com