महायुती सरकारची महत्वकांक्षी योजना म्हणून ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेकडे पाहिले जाते. विधानसभा निवडणुकीत हीच योजना गेम चेंजर ठरली होती. महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं होतं. ही योजना ज्या वेळी सुरू करण्यात आली त्यावेळी सुरूवातीचे महिने वेळेवर लाडक्या बहीणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले होते. काहींच्या खात्यातर एकच पैसे जमा झाले होते. पण निवडणुकीचा निकाला लागला त्यानंतर ही गती थोडी मंदावली. 15 जानेवारी होवून गेली तरी या महिन्याचा हाफ्ता अजूनही बहीणींच्या खात्यात जमा झाला नाही. बँकाच्या चक्कर मारून त्या थकल्या पण खात्यात काहीच नव्हते. आता हा हाफ्ता 26 जानेवारीला जमा होणार असल्याची माहिती महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यमंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीनंतर आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा थकलेल्या हाफ्त्या बाबत माध्यमांना माहिती दिली. लाडकी बहीण योजनेचे पैसे येत्या 26 जानेवराली महिलांच्या खात्यात जमा होतील असं त्यांनी सांगितलं. त्याची प्रक्रीया पुढील काही दिवसात सुरू होईल. मात्र सर्वांना उत्सुकता होती ती या लाडक्या बहीणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार की 2100 रुपये जमा होणार याची. त्याबाबतही तटकरे यांनी माहिती दिली आहे.
राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी 3 हजार 690 कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं. मात्र लाडक्या बहीणांना यावेळी 1500 रुपये मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहीणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. त्यामुळे नव्या वर्षात 2100 रुपये खात्यात जमा होतील अशी आशा बहीणींना होती. मात्र याबाबतचा निर्णय अर्थ संकल्पात घेतला जाईल असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. त्यामुशे अर्थ संकल्पात त्याची तरतूद केली जाते का हे आता पहावे लागेल. त्यामुळे तुर्तात तरी 1500 रुपयांवर महिलांना समाधान मानावे लागणार आहे. शिवाय निकषात न बसणाऱ्या किती महिलांना यावेळी वगळण्यात आलं आहे याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world