देवा राखुंडे , बारामती
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपची मस्ती वाढली आहे, मी त्यांची मस्तीच जिरवतो , असं म्हणत जानकर यांना भाजपवर निशाणा साधला आहे. महादेव जानकर बारामतीच्या कन्हेरी येथे प्रचारसभेत बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपने काय केलं? शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली कुठला माणूस कुठे ठेवायचा नाही. आमचे एक दोन आमदार होते ते आमदार पण पळवले. आमचा आमदार निवडून येतो आमच्या पक्षावर आणि तुम्ही भाजप बरोबर घेऊन जाता. आता तुमची मस्ती जिरवतो असा इशाराच महादेव जानकर यांना दिला आहे.
माझ्या मागे लागले होते, मला फोनवर फोन येत होते. मी पण वर सांगितलं माझ्या पीएसोबत बोला. महादेव जानकर तुमची सत्ता घालवल्याशिवाय पुन्हा तुमच्यावर बोलणार नाही, असा इशाराच महादेव जानकर यांनी दिला.
ट्रेंडिंग बातमी - शहाजी बापूंच्या गडात उद्धव ठाकरेंचं 'काय झाडी काय डोंगर' सभा गाजवली
माझ्याही मागे ईडी लावली असती
मी जर घोटाळा केला असता, चोऱ्या केल्या असत्या तर माझ्याही मागे ईडी लावली असती. मला म्हणाले असते तुम्हाला आमच्याबरोबर राहावं लागेल, नाहीतर आत तुरुंगात टाकू. मारुतीच्या साक्षीने सांगतो महादेव जानकर भ्रष्टाचारी नाही, असं म्हणत महादेव जानकर यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.
(नक्की वाचा- पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल)
पवारांवरही टीका
राष्ट्रीय समाज पक्षामध्ये सर्व जाती धर्मातल्या व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. पवारांची यादी बघितली तर त्यांचे नातेवाईकच उमेदवार आहेत. मेव्हणा, जावई, सासरा त्यामुळे जागं व्हा. बहुजन समाजातील आमदार खासदार झाले तर हक्काने अधिकाराने तुम्ही लढू शकता. तुमचा हक्क आणि अधिकारावर ह्याच मंडळींने कब्जा केला आहे. तुम्हाला तुमचा हक्क आणि अधिकार मिळवायचा असेल तुम्हाला तुमच्या ती माणसं निवडावी लागतील, असं आवाहनही महादेव जानकर यांनी केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world