जाहिरात

Pune News : पिझ्झाची ऑर्डर केली म्हणून विद्यार्थिनींना वसतिगृहातून काढलं बाहेर, पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार 

Pizza Online Order : पिझ्झाची ऑर्डर करणं पुण्यातील विद्यार्थिनींना महागात पडलं आहे.

Pune News : पिझ्झाची ऑर्डर केली म्हणून विद्यार्थिनींना वसतिगृहातून काढलं बाहेर, पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार 

Ordered Pizza at hostel : पिझ्झाची ऑर्डर करणं पुण्यातील (Pune News) विद्यार्थिनींना महागात पडलं आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील काही विद्यार्थिनींनी पिझ्झाची ऑनलाइन ऑर्डर (Pizza Online Order) केली होती. मात्र ही बाब वसतिगृहाच्या प्रमुखांना कळली. त्यांनी तातडीने या मुलींना महिनाभरासाठी वसतिगृहात प्रवेश बंदी आणली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पिंपरी शहरातील मोशी परिसरात समाज कल्याण विभागाचं मुलींचं वसतिगृह आहे. येथील एका खोलीत राहणाऱ्या चार विद्यार्थिनींनी दोन दिवसांपूर्वी खाण्यासाठी पिझ्झाची ऑनलाइन ऑर्डर केली आहे. ही बाब वसतिगृहाच्या गृहप्रमुख मिनाक्षी नारहारे यांना कळली आणि त्यांनी एक अजब फतवा जारी केला. त्यापूर्वी चौघींपैकी कोणी पिझ्झाची ऑर्डर केली याची चाचपणी करण्यात आली. मात्र ते स्पष्ट होत नसल्याने चौघींनाही एका महिन्यासाठी वसतिगृहावर येण्यास बंदी घातली आहे.

Aarushi Pokhriyal Nishank : बॉलिवूड प्रेम पडलं महागात; माजी मुख्यमंत्र्यांच्या देखण्या मुलीला 4 कोटींचा चुना

नक्की वाचा - Aarushi Pokhriyal Nishank : बॉलिवूड प्रेम पडलं महागात; माजी मुख्यमंत्र्यांच्या देखण्या मुलीला 4 कोटींचा चुना

वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाहेरील व्यक्ती किंवा खाद्य पदार्थ आणण्यास नियमानुसार बंदी आहे. मुलींनी पिझ्झा मागवून मुलींच्या सुरक्षिततेबाबतचे नियम मोडले आहे. त्यामुळे चौघांविरोधात कारवाई केली जात असल्याचं वसतिगृहाच्या गृहप्रमुख यांनी विद्यार्थिनी आणि पालकांना एका लेखी पत्राद्वारे कळविलं आहे. मात्र अशा चुकांसाठी नियमांनुसार विद्यार्थिनींना प्रवेश बंदी करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने पारित केले आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पिझ्झा मागविला म्हणून महिनाभरासाठी मुलींना वसतिगृहात प्रवेश बंदी आणणं कितपत योग्य आहे, असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: