जाहिरात
This Article is From Sep 17, 2024

प्रियकरासोबत आईने 'त्या' अवस्थेत पाहिलं; लेकीने जागेवरच जन्मदातीला संपवलं! 

मुलगी आणि आईच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार खालापूर येथून समोर आला आहे.

प्रियकरासोबत आईने 'त्या' अवस्थेत पाहिलं; लेकीने जागेवरच जन्मदातीला संपवलं! 
खालापूर:

मुलगी आणि आईच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार खालापूर येथून समोर आला आहे. प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याने मुलीने आईची हत्या केल्याचा भयंकर प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. खालापूर तालुक्यातील वावोशी विभागातील परखंदे अहिल्यानगर गावात ही घडली आहे. (Killed Mother)

संगीता मारुती झोरे (वय 42) या दोन मुलींसह परखंदे अहिल्यानगर गावात राहत होत्या. मंगळवार 10 सप्टेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास संगीता यांना झोपेतून अचानक जाग आली. त्यावेळी संगीता हिने आपली मोठी मुलगी भारती (वय 20) ही तिचा प्रियकर संतोष दत्तात्रय नांदगावकर (वय 34 ) यांच्या सोबत शरीर संबंध करीत असताना पाहिलं. त्यावेळी संगीता यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यावर संतोष नांदगावकर याने संगीताचे तोंड दाबून त्यांना जमिनीवर खाली पाडलं. त्याने संगीताच्या तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरलं. मुलगी भारतीने आई संगीताचे पाय धरुन ठेवले. श्वास कोंडल्याने संगीता यांचा मृत्यू झाला. संगीताचा खून केल्याचा कोणाला संशय येवू नये म्हणुन मुलगी भारती हिने आणि संतोष प्रियकर यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संगीताचा मृतदेह साडीने घराच्या छताच्या लोखंडी पाईपला लटकवला. आणि त्या ठिकाणी लाकडी स्टूल ठेवून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 

इडली खाताना श्वास अडकला अन् मृत्यू; ओनम सणाच्या दिवशी कुटुंबावर आघात

नक्की वाचा - इडली खाताना श्वास अडकला अन् मृत्यू; ओनम सणाच्या दिवशी कुटुंबावर आघात

मात्र संगीता यांची दुसरी मुलगी सुरेखा (वय 18) हिने घडलेला सर्व प्रकार पाहिला होता. तिने त्या रात्री घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. दरम्यान पोलिसांकडून याचा अधिक तपास केला जात आहे. मुलीच्या या कृत्याचा परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. शरीर संबंध करीत असताना आईने पाहिल्याने मुलीने प्रियकराच्या मदतीने आईला संपवलं.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: