दक्षिणात्य समाजाच्या ओनम या सणाच्या दिवशी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ओनम (Onam Fest) या सणाच्या दिवशी 50 वर्षीय सुरेश यांचा दुर्देवी मृत्यू झाला. इडली खात असताना त्यांना जीव गमवावा लागला. ही घटना पलक्कड जिल्ह्यातील कांजीकोड गावात घडली.
केरळमधील (Keral News) कांजीकोड गावात ओनम सणाच्या दिवशी एका स्पर्धेचं आयोजन (Idli eating competition) करण्यात आलं होतं. 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण केरळमध्ये ओनमचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जात होता. कांजीकोड गावातील काही तरुणांनी या सणाच्या निमित्ताने इडली खाण्याची स्पर्धा ठेवली होती. यामध्ये अनेक तरुण सहभागी झाले होते. ५० वर्षीय सुरेशदेखील या स्पर्धेत सहभागी झाले होते. कमी कालावधीत जास्तीत जास्त इडली खाणाऱ्याला बक्षीस मिळणार होतं.
नक्की वाचा - एक सही अन् ससूनचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात; पुण्यात 4 कोटींचा फ्रॉड, 25 जणांवर कारवाई!
स्पर्धा सुरू होताच सर्वांनी इडली खायला सुरुवात केली. सुरेशदेखील एकामागून एक इडली खात होते. मात्र एक इडली त्यांच्या घशात अडकली. त्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ते तेथेच खाली कोसळले. तातडीने सुरेश यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याकारणाने डॉक्टरांनी त्यांना दुसरीकडे हलवलं. मात्र तेथेही सुरेश यांचा जीव वाचवता आला नाही. यादरम्यान सुरेश यांचा मृत्यू झाला. स्पर्धेत जिंकण्यासाठी ते एकामागून एक इडली खात होते. घशात इडली अडकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. ओनम सणाच्या दिवशी कुटुंबावर शोककळा पसरली. काही क्षणापूर्वी आनंद साजरा होत असलेल्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world