Kalyan News: टिटवाळ्यात घबराट,12 गुंडांचा 'त्या' चाळीवर सशस्त्र हल्ला, महिलांचे कपडे फाडून अत्याचाराचा प्रयत्न

कल्याण जवळील टिटवाळ्यात चाळ माफियांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हफ्ता दिला नाही म्हणून एका वयोवृद्ध महिलेच्या घरावर 10 ते 12 गुंडांनी सशस्त्र हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Goon Attack In Titwala Chawl

Kalyan Crime News :  कल्याण जवळील टिटवाळ्यात चाळ माफियांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हफ्ता दिला नाही म्हणून एका वयोवृद्ध महिलेच्या घरावर 10 ते 12 गुंडांनी सशस्त्र हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.तोंडाला रुमाल लावलेले गुंड टिटवाळ्याच्या सदगुरू चाळीत अचानक आले.या गुंड्यांनी बसने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.या गुंड्यांच्या हातात हातोडे,लाठ्या-काठ्या होत्या.त्यांनी एका घराची अक्षरशः तोडफोड केली.धक्कादायक बाब म्हणजे या नराधमांनी घरात घुसून महिलांना बेदम मारहाण केली आणि एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.या घटनेमुळे संपूर्ण टिटवाळा परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

चाळ माफियांनी सुरु केला नवा गोरखधंदा

या घटनेनंतर पीडित महिलेने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.टिटवाळा परिसरात अनधिकृत चाळी बांधून गोरगरीब जनतेला विकायच्या आणि नंतर त्याच रूमच्या दुरुस्तीसाठी पुन्हा लाखो रुपयांची खंडणी उकळायची,असा नवा गोरखधंदा या चाळ माफियांनी सुरू केला आहे. सद्गुरु चाळीत राहणाऱ्या रमा कदम यांनी चाळ माफिया किरण राजन गुजरे याच्याकडून एक रूम विकत घेतली होती. घर जुने झाल्याने कदम यांनी घराच्या दुरुस्तीचे काम काढले.त्यानंतर मुख्य आरोपी किरण गुजरे याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.

Advertisement

नक्की वाचा >> Raigad News: माणगावमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना! आईनं स्वत:ला संपवत चार मुलांनाही विष पाजलं, पुढे जे घडलं..

पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळणार?

रमा कदम यांनी पैसे देण्यास नकार दिला.त्यानंतर किरण गुजरे याने त्याच्या 10 ते 12  गुंडांना बोलावून कदम यांच्या घरावर हल्ला केला.हातोड्याने घर फोडण्यात आले.घरातील महिलांचे कपडे फाडून त्यांना मारहाण करण्यात आली.

नक्की वाचा >> Pranit More 370 रुपये बिर्याणी प्रकरणावर मुंबई पोलिसांचं सडेतोड उत्तर, 'ती' व्हायरल पोस्ट पाहून सर्वच थक्क

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.गोरगरिबांवर अशा प्रकारे दहशत माजवून पैसे उकळणाऱ्या या चाळ माफियांच्या मुसक्या पोलीस कधी आवळणार? पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळणार?याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.