जाहिरात

Vaishnavi Hagawane death : हगवणेंभोवतीचा फास अधिक घट्ट, JCB विक्री प्रकरणात इंडसइंड बँकेची चौकशी

प्रशांत येळवंडे यांनी हगवणेकडून खरेदी केलेला जेसीबी नेमका कोणी जप्त केला? जप्ती आणलेला जेसीबी गोडाऊनमधून जप्त कसा झाला? यासंदर्भात बँकेची चौकशी केली जाणार आहे. 

Vaishnavi Hagawane death : हगवणेंभोवतीचा फास अधिक घट्ट, JCB विक्री प्रकरणात इंडसइंड बँकेची चौकशी

सुनेचा छळ, पैशांच्या लोभाबरोबरच हगवणे कुटुंबावर आर्थिक फसवणुकीचाही आरोप करण्यात आला आहे. वैष्णवी हगवणेचा नवरा शशांक आणि सासू लता हगवणे या दोघांना आर्थिक फसवणूक प्रकरणात तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांनी जेसीबी विक्री करताना प्रशांत येळवंडे यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणात इंडसइंड बँकेचीही चौकशी केली जाणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हगवणे जेसीबी विक्री प्रकरणी आता थेट इंडस इंड बँक चौकशीच्या फेऱ्यात अडकलं आहे. म्हाळुंगे पोलिसांनी बँकेच्या लीगल डिपार्टमेंटला चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शशांक आणि लता हगवणे या माय-लेकाने येळवंडे यांची 11 लाख 70 हजारांची फसवणूक केलीये. या प्रकरणी माय-लेकाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. त्यानंतर म्हाळुंगे पोलिसानी थेट इंडस इंड बँकेला चौकशीच्या फेऱ्यात घेतलेलं आहे.

Solapur Crime : पुण्यानंतर सोलापुरही हादरलं! 3 महिन्यांच्या गर्भवती आशाची सासरच्यांकडून हत्या? कुटुंबाचा गंभीर आरोप 

नक्की वाचा - Solapur Crime : पुण्यानंतर सोलापुरही हादरलं! 3 महिन्यांच्या गर्भवती आशाची सासरच्यांकडून हत्या? कुटुंबाचा गंभीर आरोप

जेसीबी विक्री फसवणूक प्रकरण काय आहे? 
मिळालेल्या माहितीनुसार, लता आणि शशांक हगवणे यांनी प्रशांत येळवंडे याला जेसीबीची विक्री केली होती. हा जेसीबी मुळात इंडसइंड बँकेकडून हफ्त्याने घेण्यात आला होता. त्याचे हफ्ते सुरू असतानाच हगवणे कुटुंबीयांनी येळवंडे यांना जेसीबीची विक्री केली. यासाठी त्यांनी येळवंडेकडून 11 लाख 70 हजार घेतले. मात्र मुळात त्यांनी बँकेचं लोन फेडलं नाही. यानंतर काही दिवसांनी बँकेने हा जेसीपी जप्त केला. शशांक हगवणे यांनी पैसे देण्याच कबुल केलं, मात्र प्रत्यक्षात पैसे दिले नसल्याचा आरोप येळवंडेंकडून केला जात आहे. बँकेने जप्ती आणलेला जेसीबी काही दिवसांनी शशांक हगवणेंच्या घराजवळ आढळल्याने अनेक सवाल उपस्थित झाले आहे. त्यामुळे प्रशांत येळवंडे यांनी हगवणेकडून खरेदी केलेला जेसीबी नेमका कोणी जप्त केला? जप्ती आणलेला जेसीबी गोडाऊनमधून जप्त कसा झाला? यासंदर्भात बँकेची चौकशी केली जाणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com