जाहिरात

Crime News: सोन्या-चांदीची लूट करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, बँक फोडल्याचीही पोलिसांना दिली कबुली

पोलिसांनी दरोडेखोरांकडून 11 तोळे 4 ग्राम सोने आणि 3 किलो 600 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Crime News: सोन्या-चांदीची लूट करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद,  बँक फोडल्याचीही पोलिसांना दिली कबुली
Gold Robbery latest News

समाधान कांबळे, प्रतिनिधी

Hingoli Crime News : रातोरात लखपती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना हिंगोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कापडशिंगी ते लोणार मार्गावरील धानोरा शेत शिवारात सहा दरोडेखोरांनी  सोनाराला अडवलं होतं. त्यानंतर चोरट्यांनी त्याला चाकूचा धाक दाखवून 30 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले होते. त्यानंतर या सोने व्यापाऱ्याने सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि आंतरजिल्हा टोळीतील सहा अट्टल दरोडेखोरांना अटक केली. 

सहा दरोडेखोरांनी सोने व्यापाऱ्याला शिवारात अडवलं अन् नंतर..

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कापडशिंगी ते लोणार मार्गावरील धानोरा शेत शिवारामध्ये सोन्या चांदीचे दुकान बंद करून सोनार घरी जायला निघाला होता. त्यावेळी सहा दरोडेखोरांनी त्यावा शिवारात आडवलं आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडे असलेले दागिने लुटले.त्यानंतर सोनाराने सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार नोंदवली.

नक्की वाचा >> Mumbai Pune Traffic: "बायकांना टॉयलेटला जाता आलं नसेल, टोल वाढवायचा..", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट Viral

सेनगाव पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची तातडीनं दखल घेत गुन्हा नोंदवला आणि पुढील तपास सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दरोडेखोरांना अटक केली. पोलिसांनी दरोडेखोरांकडून 11 तोळे 4 ग्राम सोने आणि 3 किलो 600 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दरोडेखोरांनी यापूर्वी बँक लुटल्याची कबुलीही पोलिसांना दिली.

नक्की वाचा >> Pune News : पुण्याच्या तळेगाव दाभाडेत रक्तरंजित थरार, दारू पार्टीत मित्राचा भयंकर शेवट, हादरंवून टाकणारं कारण

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com