
प्रेम विवाह करणं तो ही अंतरजातीय हे अजूनही समाजातील अनेकांच्या पचनी पडलेलं नाही. त्यामुळे त्याल विरोध हा होतच आहे. त्यातून टोकाची पावलं उचलली जात आहे. प्रेम, संसार बहरण्या आधीच त्यांना संपवलं जात आहे. अशीच एक धक्कादायकर घटना बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात घडली आहे. इथं एका बापानेच आपल्या मुलीचा खून केला आहे. त्यासाठी त्याने जो काही सापळा रचला ते चौकशीत समोर आल्यानंतर सर्वच जण हादरून गेले आहेत. पोलिस ही त्यांच्या याकृतीने हबकले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
साक्षी सिंह ही तरूणी बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात राहाणारी होती. टाडा हे तिचं गाव. याच गावात ती आपल्या कुटुंबीयां समवेत राहात होती. ती शिक्षण सुरू होतं. त्यामुळे कॉलेजला ये जा सुरू होती. त्याच वेळी तिच्या बाजूच्या गावातल्या तरुणाबरोबर तिची ओळख झाली. पुढे त्यांच्यात प्रेम निर्माण झालं. पण दोघांची ही जात वेगवेगळी होती. त्यामुळे घरातून विरोध होणार हे दोघांनाही माहित होतं. त्यामुळे ते दोघे ही घरातून पळून गेले. त्यांनी दिल्ली गाठली.
ट्रेंडिंग बातमी - CIDCO News: सिडकोची परत एक मुदत वाढ, माझे पसंतीचे घर योजने आता नवा ट्वीस्ट
साक्षी आपल्या प्रियकरा बरोबर पळून गेल्याचं तिचे वडील मुकेश सिंह यांना समजलं. त्यांचा राग अनावर झाला. त्यातूनच त्यांनी एक कट रचला. त्यांनी मुलीला फोन केला. तिच्या बरोबर गोडगोड बोलले. शिवाय लग्न लावून देण्याचं ही सांगितलं. शिवाय तिला दिल्लीतून गावी परत बोलवून घेतलं. वडीलांच्या शब्दावर साक्षीने विश्वास ठेवला. ती दिल्लीतून घरी परत आली. तिथेच तिचा घात झाला. घरी आल्यानंतर वडीलांच्या डोक्यात भलतच सुरू होतं.
घरी लेक आल्यानंतर बापाच्या मनातला शैतान जागा झाला. घरात कुणी नसताना त्यांनी आपल्या 25 वर्षाच्या लेकीचा गळा आवळला. तिचा खून केला. त्यानंतर बापाने तिचा मृतदेह घरात बंद असलेल्या बाथरूममध्ये टाकून दिला. बाहेरून लॉक ही लावले. सात एप्रिलला हा खून करण्यात आला. साक्षीची आई घरी आल्यानंतर मुलगी कुठे गेली आहे याची विचारणा तिने केली. पण बापाने काही सांगितले नाही. शिवाय ती परत पळून गेली असेल असं आपल्या पत्नीला सांगितलं. त्यानंतर आईला शंका आली. त्यांनी आपल्या भावाला ही गोष्ट सांगितली. पुढे त्यांनी पोलिसात याबाबत तक्रारही दाखल केली. पोलिसांनी घरी याबाबत तपास केला.
त्यावेळी एक खोली बंद दिसली. ते बाथरूम होते. अनेक दिवसापासून ते बंद असल्याचं सांगण्यात आले. ते जेव्हा खोलण्यात आले त्यावेळी आत साक्षीचा मृतदेह होता. याबाबत मुकेश सिंह याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. समाजात होणाऱ्या बदनामी मुळे आपण हे पाऊल उचलले असल्याचे त्याने सांगितले. शिवाय त्यानंतर तो तिच्या प्रियकराला ही मारण्यासाठी गेला होता. पण तो त्याला सापडला नाही. त्यामुळे त्याचे प्राण वाचले ही माहितीही चौकशीत समोर आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world