जाहिरात
This Article is From Sep 14, 2024

राहुल सासुरवाडीला आला, 3-4 दिवस राहिला; पत्नीचा राग मेहुण्याच्या बाळावर...; संतापजनक प्रकार!

पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने मेहुण्याच्या तीन वर्षाच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथे घडली आहे.

राहुल सासुरवाडीला आला, 3-4 दिवस राहिला; पत्नीचा राग मेहुण्याच्या बाळावर...; संतापजनक प्रकार!
श्रीरामपूर:

पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने मेहुण्याच्या तीन वर्षाच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथे घडली आहे. पती-पत्नीच्या वादातून एक लहान मुलाची अत्यंत निघृणपणे हत्या (Murder) करण्यात आली. या नराधमाने पत्नीचा राग घरातील लहानग्यावर काढला. 3 सप्टेंबर रोजी श्रीरामपुर तालुका पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आणि वैजापूर तालुक्यातील संशयित आरोपी राहुल बोधक याला ताब्यात घेतलं. (Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल बोधक याने पत्नीच्या मेहुण्याच्या तीन वर्षांच्या मुलाचं अपहरण केलं. यानंतर त्याचा गळा दाबुन मुलाचा खून केला. आरोपीने पोलिसांसमोर याची कबुली दिली. मात्र तो मृतदेहाची जागा चुकीची सांगत पोलिसांची दिशाभूल करीत होता. यानंतर पोलिसांनी तंत्रज्ञानाची मदत घेत चिमुड्याचा मृतदेह गारज शिवरातील मक्याच्या शेतातून शोधून काढला. सुरुवातीलाच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये आता खुनाचं कलम वाढवण्यात आलं आहे.

10 वर्षांनी पाळणा हलला, बारसं करून पुण्याला जाताना कुटुंब संपलं; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे 4 हकनाक बळी!

हे ही वाचा - 10 वर्षांनी पाळणा हलला, बारसं करून पुण्याला जाताना कुटुंब संपलं; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे 4 हकनाक बळी!

टाकळीभान येथे आपल्या सासुरवाडीला आरोपी तीन-चार दिवस राहिला. राहुलची पत्नी सासरी नांदायला येत नसल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर राहुलने मेहुण्याचा तीन वर्षाचा मुलगा अभिजीत त्रिभूवन याचं अपहरण केलं. याप्रकरणी कुटुंबीयांनी श्रीरामपूर पोलिसात 3 सप्टेबर रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. शेवटी हे कृत्य आरोपी राहुलने केल्याचं उघड झालं. आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आणि अभिजीतचा गळा दाबून त्याचा खून केल्याची कबुलीही दिली. सुरुवातील आरोपी पोलिसांना चुकीची माहिती देऊन भरकटवण्याचा प्रयत्न करीत होता. शेवटी पोलिसांनी तांत्रिक मदतीने मक्याच्या शेतातून मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून श्रीरामपूर तालुका पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: