Sangli Crime News Today : सांगलीच्या विटामध्ये पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून निघृण खून केल्याची घटना विटा येथील नेवरी रस्त्यावर मंगळवारी सकाळी उघडकीस आली.श्रद्धा अविनाश लोटके (वय 20,रा. नेवरी रोड,सुतारकी मळा,विटा) असे मृत पत्नीचे नाव आहे.आरोपी अविनाश पत्नी श्रद्धाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा.दुसरीकडे पतीच्या तृतीयपंथीयाशी असलेल्या सलगीवरुन दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचा.याच कारणांमुळे ही घटना घडल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे.घटनेनंतर आरोपी पती सोनल ऊर्फ अविनाश तुकाराम लोटके (27) याने त्याच्या तीन वर्षाच्या लहान मुलाला मित्राच्या घरी सोडून पलायन केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मुलाला मित्राकडे सोडून अविनाश पसार झाला होता.सकाळी उशिरापर्यंत अविनाश मुलाला घ्यायला आला नसल्याने मित्र कोरडे याने थेट अविनाशंचे घर गाठले.त्यावेळी खिडकीतून आत पाहिले असता श्रद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.त्याने तातडीने घरमालक गाडे यांच्याशी संपर्क साधला.त्यानंतर गाडे यांनी विटा पोलिसांना माहिती दिली.विटा येथील आरोपी सोनल ऊर्फ अविनाश लोटके हा शहरातील एका गॅस एजन्सीकडे सिलिंडर डिलिव्हरीचे काम करतो.
नक्की वाचा >> Jalgaon News: भोंदूबाबाची पत्नी मुंबई पोलिसात, दोघांनी मिळून महिलेला 11 लाखांना गंडवलं, अघोरी पूजा-करणी अन्..
आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना
घटनेनंतर पती अविनाश हा फरार झाल्याने पोलिस पथक त्याचा शोध घेत आहे.श्रद्धा हिची मावशी दीपाली साठे यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. अविनाश हा पत्नी श्रद्धा हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता.तसेच सलगी अविनाश याची तृतीयपंथीयाशी असल्याचा संशय असल्याने त्यास पत्नी श्रद्धा विरोध करीत होती.त्यामुळे दोघांत नेहमी वाद होत होते.श्रद्धाची आई मुंबईत वास्तव्यास असते.त्यामुळे श्रद्धा विट्यात तिची मावशी दीपाली शशिकांत राहत साठे यांच्याकडे लहानपणापासून होती.
नक्की वाचा >> BMC मध्ये चोरी! शिवसेना नगरसेविका लक्ष्मी भाटियांच्या पर्समधून 'लक्ष्मी' चोरली, सभागृहात किती रुपये लांबवले?
लग्नानंतर अविनाश व श्रद्धा हे दोघेही त्यांच्या तीन वर्षाच्या मुलासह नेवरी रस्त्यावरील सुतारकी मळा येथे सुनील गाडे यांच्याकडे भाड्याच्या घरात राहात होते. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अविनाश व श्रद्धा हे दोघेही यात्रेत फिरायला गेले होते.घरी परत आल्यानंतर या पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले.यातूनच मध्यरात्री अविनाश याने पत्नी श्रद्धाच्या डोक्यात,पाठीवर, उजव्या हातावर,चेहऱ्यावर,कपाळावर लोखंडी रॉडने हल्ला केला.यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर आरोपी पती अविनाश याने त्याच्या तीन वर्षाच्या मुलाला पहाटे चार वाजता त्याच्या रोहित कोरडे नामक मित्राकडे घरी सोडून पलायन केले.सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या खुनाच्या घटनेने विटा शहर हादरले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world