जाहिरात

Kalyan News : जीवाशी खेळ ! कल्याणमधील प्रसिद्ध हॉटेलच्या पावभाजीत आढळला लाेखंडी तुकडा

Kalyan News : जीवाशी खेळ ! कल्याणमधील प्रसिद्ध हॉटेलच्या पावभाजीत आढळला लाेखंडी तुकडा
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी

सध्या दिवाळीचे दिवस असल्यानं हॉटेलमध्येही मोठी गर्दी आहे. दिवाळीनिमित्त एकत्र आलेली मंडळी सहकुटुंब, सहपरिवार हॉटेलमध्ये गर्दी करत आहे. पावभाजी हा तर मुंबईकरांचा आवडीचा पदार्थ. कल्यामधील प्रसिद्ध हॉटेलमधील पावभाजीत लोखंडी तुकडा पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. संतापजनक बाब म्हणजे ग्राहकानं लोखंडी तुकडा पावभाजीत आढळल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर हॉटेल व्यवस्थापकानं चूक मान्य न करता उद्धटपणा केल्याची माहिती आहे.  या प्रकरणात संबंधित ग्राहकाने महात्मा फुले पाेलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केलाय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

उल्हासनगरमधील सी ब्लाॅक परिसरात राहणारे सुबाेध गवळी त्यांची पत्नी आणि दाेन मुलींसह कल्याणमधील प्रसिद्ध रामदेव हॉटेलमध्ये शुक्रवारी संध्याकाळी नाश्ता करण्यासाठी गेले होते.  सुबाेध गवळी यांनी त्यांच्यासाठी पावभाजी आणि दूधाची ऑर्डर दिली. थाेड्याच वेळात त्यांच्या टेबलावर पावभाजी आली. आठ वर्षाच्या मुलीने पावभाजी खाण्यास सुरुवात केली की, तिच्या दाताखाली काही जड वस्तू आली. तिने ती गिळण्याआधीच ताेंडाबाहेर काढली. ती जड वस्तू पाहून तिच्या आईला आणि वडिलांना धक्काच बसला. 

त्यांना ती वस्तू खडा असेल असं वाटलं होतं. पण पाण्याने धुतल्यावर ताे लाेखंडाचा तुकडा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर संबंधित कुटुंबियांनी हाॅटेल व्यवस्थापकाना याची माहिती दिली. त्यांनी त्यांची चूक मान्य करण्याऐवजी गवळी कुटुंबाला उलट सुलट उत्तरे देत उद्धटपणा केली. सुबाेध गवळी यांनी लगेचच महात्मा फुले पाेलिस स्टेशनमध्ये पाेहचले. त्यांनी पोलिसांकडं या प्रकरणाची तक्रार दिली. 

मालाडचा तरुण कामासाठी कल्याणमध्ये आला, भर रस्त्यात घडला भयंकर प्रकार!

( नक्की वाचा :  मालाडचा तरुण कामासाठी कल्याणमध्ये आला, भर रस्त्यात घडला भयंकर प्रकार! )

या प्रकरणी महात्मा फुले पाेलिल ठाण्याचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक स्वप्नील भूजबळ यांनी सांगितले की, ' पाेलिसांनी हाॅटेलात जाऊन सीसीटीव्ही फूटेज चेक केले आहे. त्यानंतर संबंधित ग्राहकाची तक्रार दाखल करुन घेतली आहे. याप्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल. हा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे. पावभाजी तयार करताना हाॅटेलने निष्काळजीपणा आणि ग्राहकाशी उद्धटपणा केल्याबद्दल हॉटेल व्यवस्थापकावर पोलीस काय कारवाई करणार याकडं लक्ष लागलं आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com