जाहिरात

Jalgaon News: जळगावात हद्द झाली! पोलीस मुख्यालयाच्या शेजारीच पिस्तूल लावून पैशांची उधळण; 'तो' तरुण कोण?

Jalgaon News : जळगाव पोलीस मुख्यालयाच्या हद्दीतील 'पद्मालय' सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात एका तरुणाने कमरेला पिस्तूल लावून चक्क पैशांची उधळण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jalgaon News: जळगावात हद्द झाली! पोलीस मुख्यालयाच्या शेजारीच पिस्तूल लावून पैशांची उधळण; 'तो' तरुण कोण?
Jalgaon News: या प्रकरणात पोलीस महासंचालकांकडे तक्रार झाल्यानंतर या तरुणाविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव:

मंगेश जोशी, प्रतिनिधी

Jalgaon News : जळगाव पोलीस मुख्यालयाच्या हद्दीतील 'पद्मालय' सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात एका तरुणाने कमरेला पिस्तूल लावून चक्क पैशांची उधळण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस महासंचालकांकडे तक्रार झाल्यानंतर या तरुणाविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

जळगाव पोलीस मुख्यालयाच्या परिसरात, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाजवळ असलेल्या 'पद्मालय' सभागृहात दिवाळीनिमित्त काही पोर्टल संस्थांनी एकत्र येत 'सुफी नाईट' गायन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अनेक बडे अधिकारी आणि महत्त्वाचे व्यक्ती उपस्थित होते.

याच कार्यक्रमादरम्यान, संशयित तरुण पियुष मणियार याने आपल्या कमरेला पिस्तूल लावून ठेवली होती आणि सुफी गायकावर तसेच आपल्या काही मित्रांवर पैशांची उधळण करत बेकायदेशीर कृत्य केले. या कृत्यातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे.

( नक्की वाचा : Akola News: अकोला हादरले! गजानन हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे टोकाचे पाऊल; दरवाज्यातून समोर आले भयावह सत्य )
 

पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

जळगाव शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून 'भाईगिरी' करणाऱ्यांवर पोलीस करडी नजर ठेवून असताना, खुद्द पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या सभागृहात हा गंभीर प्रकार घडला. पिस्तूल लावून पैशांची उधळण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असतानाही, पोलिसांनी त्याची तात्काळ दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे आणि पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अखेर गुन्हा दाखल

कमरेला पिस्तूल लावून पैशांची उधळण करणारा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या घटनेची गंभीर दखल घेत जळगावमधील सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी थेट पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केली. महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर जळगाव पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन अखेर संशयित पीयुष मणियार याच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडल्यानंतरही महासंचालकांना यात लक्ष घालावे लागले, हे विशेष आहे.

( नक्की वाचा : Nashik News नाशिकच्या रस्त्यावर 'सिंघम' स्टाईल ॲक्शन; आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची धावत्या ऑटोतून उडी, Video )
 


या कार्यक्रमात कायदा धाब्यावर बसवला जात असतानाही, हे उघड्या डोळ्यांनी पाहणारे ते अधिकारी व महत्त्वाचे व्यक्ती कोण होते, याचीही सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com