जाहिरात

जालना- बीड मार्गवर बस ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

बसमध्ये 25 ते 30 प्रवाशी प्रवास करत होते. त्यातले अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

जालना- बीड मार्गवर बस ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू
जालना:

जालना बीड मार्गावर भीषण अपघात झाला आहे. हा अपघात बस आणि ट्रकमध्ये झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. बसमध्ये 25 ते 30 प्रवाशी प्रवास करत होते. त्यातले अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. बस आणि ट्रक मधील जखमींना  स्थानिक नागरिकाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जालना ते बीड महामार्गावर बस आणि मोसंबी वाहतूक करणार्या ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलीये.या घटनेत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अंबाजोगाई महामंडळाची बस जालन्याकडे जात असताना महामार्गावरील मठतांडा जवळ बस येताच अंबड कडून बीडकडे मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की बसचा अक्षरशः समोरून चुराडा झालाय. तर आयशर ट्रकचा ही या अपघात चूरडा झालाय .

ट्रेंडिंग बातमी - 'लाडक्या बहिणी'चा रात्रभर बँके बाहेर मुक्काम, नंदुरबारमध्ये काय घडलं?

अपघाता वेळी बस मध्ये 30 प्रवाशी असल्याची माहिती समोर आलीय. त्यात सहा जणांचा  दुर्दैवी मृत्यू  झाला आहे. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाता नंतर परिसरातील नागरिकांनी अपघात ठिकाणी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढत त्यांना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवलं. या अपघातात गंभीर जखमींना  जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  कोविड XEC ने टेन्शन वाढवलं, 27 देशांमध्ये फैलाव; काय आहेत लक्षणे?

ट्रकमधून मोसंबी वाहतूक केली जात होती. अंबडपासून 10 किलोमिटर अंतरावर हा भीषण अपघात झाला आहे. जालना बीड मार्गावरली मठ तांडा गावाजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर तातडीने स्थानिक त्यांच्या मदतीला धावले. जखमींना त्यांनी तातडीने अंबड इथं हलवले आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात पाच ते सहा जण दगावल्याची प्राथमिक माहिती आहे. तर वीस पेक्षा जास्त प्रवाशी हे जखमी झाले आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - मविआत पुढचा मुख्यमंत्री कोणाचा? काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने थेट सांगितलं, आघाडीत बिघाडी होणार?

घटना घडल्यानंतर स्थानिकांनी मदत कार्य सुरू केले. त्यानंतर पोलीसांनाही पाचारण करण्यात आले. नक्की अपघात कसा झाला ही माहिती अजून ही पुढे आली नाही. मात्र सकाळी सकाळी हा अपघात झाल्याने मठ तांडा गाव हादरून गेले आहे. त्यांनी तातडीची मदत केल्या मुळे अनेकांच जीव वाचले. 

 

Previous Article
दुचाकीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला; दादरमधील धक्कादायक प्रकार
जालना- बीड मार्गवर बस ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू
Arrested young man from Nashik for cheating young girl on Instagram
Next Article
नाव "प्रेम" पण इंस्टावरच्या भयंकर चाळ्यांमुळे 'असा' झाला गेम