जाहिरात

Jalna news: इन्स्टा स्टारकडून वाळू माफियाने बनवून घेतले वाळू विक्रीचे रील, पुढे भाईसोबत जे घडलं ते...

योगेश गोरे आणि शिवकन्या गोरे दाम्पत्य सोशल मीडियावर नेहमी व्हिडिओ बनवत असतात.

Jalna news: इन्स्टा स्टारकडून वाळू माफियाने बनवून घेतले वाळू विक्रीचे रील, पुढे भाईसोबत जे घडलं ते...
जालना:

जालन्यातील भोकरदन मधील वाळू माफियाला इन्स्टा स्टारकडून वाळू विक्रीची रील बनवून घेणं चांगलच महागात पडलं आहे. भोकरदनमधील विरेगाव येथील सोनूची मम्मी आणि सोनूचे पप्पा अर्थात योगेश गोरे आणि शिवकन्या गोरे दाम्पत्य सोशल मीडियावर नेहमी व्हिडिओ बनवत असतात. त्यांच्याच मदतीने ही रिल बनवण्यात आली आहे. त्यामाध्यमातून वाळू विक्रीची जाहीरात करण्याचं धाडस या वाळू माफियाने केले आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सध्या भोकरदन तालुक्यातील योगेश गोरे यांच्या घराचं बांधकाम चालू आहे. त्यासाठी त्यांनी अवैधरित्या टिप्परने वाळु मागवली. मात्र त्यावेळी त्यांनी तुम्हाला जर स्वस्तात वाळु हवी असेल तर टिप्पर चालक मालक संतोष वाघ यांच्याशी संपर्क साधावा असं आव्हानही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या अकाऊंटवरून केलं. 

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?

अशा पद्धतीचं सार्वजनिकरित्या आवाहन करत त्यांनी वाळू माफीयाचीच त्यांनी एक प्रकारे जाहीरात केली आहे.   जालना जिल्ह्यात सध्या वाळु डेपोचे लिलाव झालेले नाहीत. त्यात अशा पद्धतीची  रील टिप्पर मालकानं रिलस्टार योगेश गोरे यांच्याकडून बनवून घेतली. या प्रकरणी संतोष वाघ,अमोल दौंड आणि ज्ञानेश्वर ठाले  यांच्याविरोधात भोकरदन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग बातमी - Operation sindoor: विश्व युद्धापासून भारत-पाक तणावापर्यंत, अनेकांचे प्राण वाचवणार्‍या सायरनचा इतिहास आहे खास

या व्हिडीओमध्ये हे रिल स्टार आपण घर बांधत आहोत असं सांगत आहेत. त्यासाठी पैसे साठवले होते. आम्हाला वाळू ही स्वस्तात मिळाली. त्यासाठी संतोष वाघ यांनी मदत केली. तुम्हाला ही स्वत वाळू पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करा. त्यांचा नंबरही आम्ही स्क्रिनवर देत आहोत, असं ही ते या म्हणतात. शिवाय तुम्हाल वाळू हवी आहे का असा प्रश्न ते प्रेक्षकांना करतात. शिवाय या वाघ यांच्याकडून वाळू खरेदी करा असं आवाहन ही करतात. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com