सध्या बेरोजगारीमुळे अनेक जण हैराण आहेत. जर कुठे नोकरी मिळत असेल तर काही करण्याची अनेकांची तयारी असते. नोकरी मिळाली म्हणजे काळजी मिटली. सध्या नोकऱ्याच नाहीत. अशा वेळी जर सरकारी नोकरी मिळणार असे तर मग काय विचारण्याची सोय नाही. त्यासाठी वाटेल तो शॉर्टकट घेण्याची तयारी असते. असं करताना मग गंडा घातला जातो आणि पश्चाताप करण्याची वेळ येते. अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. इथल्या जवळपास 16 तरुणांना सरकारी नोकरीचं अमिष दाखवून तब्बल 1 कोटी 14 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यातला एक जण हा सरकारी अधिकारीच असल्याचे समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नांदेड जिल्ह्याती रहिवाशी असलेले गोविंदराव गिरी यांच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. जावेद तांबोळी नावाच्या व्यक्तीची नांदेड जिल्ह्यातील मुखेड इथे ये जा होती. तो आपण सरकारी नोकरी लावून देतो असं सांगत असे. त्याची मुंबईत ओळख असल्याचंही तो सांगत होता. त्याच्या भुलथापावांनी गोविंदराज हे गंडले. त्यांच्या बरोबर अन्य तरूणही त्याच्या बोलण्याला बळी पडले. पुढे या तरूणांना बनावट निवड यादी दाखवण्यात आली. बनावट शिक्के मारून नियुक्ती पत्र ही देण्यात आली. पण हे सर्व खोटं आहे. आपली फसवणूक झाली आहे हे या तरुणांच्या लक्षात आले.
ज्या वेळी पैशांची देवाण घेवाण केली जात होती त्यावेळी काही व्हीडिओ शुट करण्यात आले होते. लपून काढलेल्या व्हिडीओ मुळे या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला. याची तक्रार नांदेड पोलिसांकडे करण्यात आली. या प्रकरणात एकून सात आरोपी होते. त्यांना पकडण्यासाठी एक पथक मुंबईला रवाना करण्यात आले. तिथून चौघांना ताब्यात घेण्यात आलं. त्यातील पनव चव्हाण हा मुख्य आरोपी आहे. तो कामगार कल्याण विभागात वर्ग दोनच्या पदावर कार्यरत आहे. त्याच्या जोडीला अन्य तीन जण आहेत. त्यात जावेद तांबोळी, रामदास शिंदे आणि कल्पेश जाधव अशी त्यांची टोळी आहे.
ट्रेंडिंग बातमी - खेळता खेळता खाली कोसळली, जीवानिशी गेली, 15 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत काय झालं?
या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून अन्य तीन जणांचा शोध सुरू आहे असं नांदेडचे पोलिस अधिक्षक अविनाश कुमार यांनी सांगितलं. या चौघांचे एक रॅकेट होते. ते गरजू तरूणांना हेरायचे आणि त्यांची फसवणूक करायचे. आता पर्यंत त्यांनी 16 तरूणांना गंडा घातला आहे. त्यांच्याकडून तब्बल एक कोटी चौदा लाख रूपये त्यांनी घेतले आहेत. पैसे घेवूनही त्यांना कोणतीही नोकरी देण्यात आली नाही. मुखेड पोलीस स्थानकांत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग बातमी - सिडकोचा आणखी एक मोठा निर्णय, पसंतीच्या घरासाठी आता...
तलाठी आणि कामगार विभागात नोकरी लावतो असे सांगत या तरूणांना आरोपी सांगत होते. त्यातूनच त्यांनी 16 तरुणांना गंडा घातला. या प्रकरणातला मुख्य आरोपी पवन कुमार चव्हाण हा लेबर ऑफीसर आहे. तो मुळचा सोलापूरचा रहिवासी असल्याचेही समोर आले आहे. तो आपल्या तीन एजंटच्या मदतीने हे रॅकेट चालवत होते. त्याने या शिवाय आणखी किती जणांना गंडा घातला आहे याचा तपास आता पोलिस करत आहे. त्यातून काही माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world