जाहिरात

Kalyan Crime: सावधान! 'त्या' दोघींपासून अलर्ट रहा, प्रवाशांसह पोलिसही झालेत हैराण; भानगड काय?

ही महिला आणि तिच्यासोबत असलेल्या मुलीचा पोलिस शोध घेत आहे. मात्र कल्याण आणि भिवंडीमध्ये सातत्याने घडत असलेल्या या गुन्हयामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. 

Kalyan Crime: सावधान! 'त्या' दोघींपासून अलर्ट रहा, प्रवाशांसह पोलिसही झालेत हैराण; भानगड काय?

कल्याण: काही दिवसापासून कल्याण आणि आजूबाजूच्या शहारात रिक्षात प्रवास करताना प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरल्या जात होत्या. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. धक्कादायक माहिती समोर आली. प्रवासा दरम्यान एक महिला एका मुलीसोबत रिक्षात बसते. संधीचा फायदा घेत वयोवृद्ध महिलांचे पर्स घेऊन पसार होते. ही महिला आणि तिच्यासोबत असलेल्या मुलीचा पोलिस शोध घेत आहे. मात्र कल्याण आणि भिवंडीमध्ये सातत्याने घडत असलेल्या या गुन्हयामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दोन दिवसापूर्वी एक वयोवृद्ध महिला कल्याणमधील एसबीएस बँकेमधून असलेल्या ला'करमधून सहा तोळे दागिने घेऊन कल्याण स्टेशनला आली. ती घरी निघून गेली. ही महिलेने रिक्षाने कल्याण स्टेशन गाठले. घरी गेल्यावर तिने तिची पर्स तपासली तेव्ही तिला धक्काच बसला. तिच्या पर्समध्ये दागिने नव्हते. या प्रकरणात वयोवृद्ध महिलेने कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार केली.

या आधी देखील कल्याण स्टेशन परिसरात रिक्षात काही वस्तू चोरीस गेल्याची घटना घडल्या आहेत. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. धक्कादायक माहिती समोर आली. सीसीटीव्हीत कल्याणमधील तिन्ही घटनेत एक महिला तिच्या सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत रिक्षात बसते. ही महिला संधीचा फायदा घेत दागिने किंवा मोबाईल अशा किंमती वस्तू चोरुन पसार होते.

नक्की वाचा - Share Market : 31 वर्षांनंतर बाजारात भयंकर परिस्थिती! काय आहेत कारणं आणि उपाय? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

भिवंडी शहरात देखील या महिला आणि मुलीने असे अनेक गुन्हे केल्याचे समोर आले आहे. भिवंडी किंवा कल्याण पोलिस या महिलेला शोधू शकलेले नाही. विशेष म्हणजे सीसीटीव्हीच्या माध्यमातून या महिलेचा माग काढण्याचा प्रयत्न केला. ही महिला प्रत्येक पाच मिनिटांना रिक्षा बदलते. लवकरात लवकर या महिलेला अटक व्हावी अशी मागणी केली जात आहे. या महिलेला शोधण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.

City Bank : कर्मचाऱ्यांचा प्रताप, ग्राहकाच्या खात्यात चुकून 7 हजार लाख कोटी पाठवले; बँकेत उडाला गोंधळ

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: