अमजद खान
कल्याण मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या आयटी सेलच्या महिला पदाधिकाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या आरोपीला कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सुशील पटेकर असे या आरोपीचे नाव आहे. तो भाजपच्या आय टी सेलमध्ये कार्यरत होता. सध्या त्याने भाजप सोडली असून तो शिंदेंच्या शिवसेनेत कार्यरत आहे. मात्र शिंदे सेनेने त्याच्यापासून हात झटकले आहे. या प्रकरणावरून ज्या भाजप महिला पदाधिकाऱ्याला त्रास झाला आहे त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना लाडकी बहीण वरून काही प्रश्न उपस्थित केले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपच्या सोशल मीडियाच्या टीमचे काम एक महिला पाहते. ही महिला 2009 पासून भाजप पक्षात आहे. या महिलेने कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात शनिवारी एक तक्रार दिली आहे. तिला सुशील पटेकर नावाचा व्यक्ती सातत्याने सोशल मीडियावर धमकी देतोय. फक्त धमकी नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या महिलेविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकतोय. हा प्रकार काही दिवसांपासून सुरू झाला होता. इतर ही महिला पदाधिकाऱ्यांना हा व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देत आहे असा त्याचा आरोप आहे.
ट्रेंडिंग बातमी - नाद करायचा नाय! पवार मुंडेंना दाखवून देणार, करेक्ट कार्यक्रमासाठी करेक्ट उमेदवार?
कोळशेवाडी पोलिसांनी सुशील विरोधात गुन्हा दखल केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्याच वेळी रविवारी सकाळी सुशीलने पुन्हा त्याच महिलेबाबत घाणेरडे कमेंट सोशल मीडियावर टाकले. अखेर या पीडित महिलेसह इतर पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी सुशील पटेकरला अटक केली आहे. त्याच्या विरोधात रविवारी सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधीही सुशील याने असेच प्रकार केले होते. त्यावेळी त्याला समज देवून सोडण्यात आले होते.
ट्रेंडिंग बातमी - 'तुझा बाप अडीच वर्ष मुख्यमंत्री होता मग...' रामदास कदम कोणावर भडकले?
मात्र परत त्याने तोच प्रकार सुरू केला असा या महिलाचा आरोप आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करेन ,तुमची लाडकी बहीण इतकी त्रासात आहे. तिला गावगुंड काही बोलतोय , त्याची हिम्मत आणखी वाढली आहे. वेळीच त्याच्यावर कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती. मी राजकारणात सक्रिय असताना असे घडत आहे. तर सर्वसामान्य महिलांबाबत काय घडत असेल असा प्रश्न त्यांनी शिंदे आणि फडणवीसांना केला आहे. आरोपी सुशील पाटेकर हा 2009 पासून भाजप पक्षात आयटीसेलचा कार्यकर्ता होता. मात्र एक वर्षापूर्वी त्याने भाजप सोडले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world