जाहिरात

Kalyan News : नेस्को सेंटरमध्ये ड्रग्स पुरवणाऱ्याच्या बापाचं मोठं कांड; कारनामे ऐकून बेट्यापेक्षा बाप सवाई!

खडकपाडा पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी पार्टीत ड्रग्स पुरवणाऱ्या आनंदला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. आता आनंद पटेल याच्या वडिलांचं मोठं कांड समोर आलं आहे.  

Kalyan News : नेस्को सेंटरमध्ये ड्रग्स पुरवणाऱ्याच्या बापाचं मोठं कांड; कारनामे ऐकून बेट्यापेक्षा बाप सवाई!

Nesco Drugs Party : तुमची मुलं कुठे जातायत, काय करतायत, ती रात्री पार्टीला जात असतील तर कुठल्या पार्टीला जातायत, तिथे काय करतायत याकडे नीट लक्ष द्या. कारण मुंबईत एक धक्कादायक पार्टी झाली. या पार्टीमध्ये बिनदिक्कत ड्रग्जची विक्री केली जात होती. पार्टीत आलेल्या अनेक तरुणांनी ही ड्रग्ज घेतली. ही ड्रग्ज घेऊन कॉलेजमधल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एका तरुणीवर उपचार सुरू आहेत. नेस्को सेंटर येथील लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट ड्रग्स पार्टी प्रकरणात ड्रग्स पुरवणारा आनंद पटेल या व्यावसायिकाला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे. खडकपाडा पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी आनंदला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. आता आनंद पटेल याच्या वडिलांचं मोठं कांड समोर आलं आहे.  

आनंद पटेल याचा बाप देखील मोठा माफिया

नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणातील आरोपी आनंद पटेल याचा बाप देखील मोठा रेशनिंग माफिया असल्याची माहिती समोर आली आहे. नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक आनंद पटेल याच्या वडिलांचादेखील मोठ्या गुन्ह्यात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.  कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात लखन पटेल यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार आणि संघटित गुन्हेगारी म्हणजे मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. कल्याणमधून आनंद पटेल याच्या अटकेनंतर ज्या परिसरात आनंद पटेल राहतो, त्या मोहन हाईटमधील रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. लखन पटेल हा गुन्हेगार तर होताच पण मुलगा आनंद देखील ऐवढ्या मोठ्या प्रकरणात अडकल्याने रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. आनंदचे वडील लखन पटेल हा कल्याण मध्ये रेशनिंग माफिया म्हणून ओळखला जातो.

नक्की वाचा - Kalyan News : तलाकसाठीच्या बैठकीत वाहिला रक्ताचा पाट; रुक्सारवर जीवघेणा हल्ला

आनंद पटेलचा बाप लखन पटेल रेकॉर्डवरचा गुन्हेगार 

कल्याणमधील रेशन माफिया लखन पटेल याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार आणि संघटित गुन्हेगारी असे गुन्हे दाखल आहेत

1 रेशनिंग धान्य काळाबाजार (MPDA कारवाई)
लखन पटेल हा कल्याण-डोंबिवली परिसरातील रेशनिंग धान्याच्या तस्करीमधील मुख्य आरोपी आहे . सरकारी रेशनचे धान्य गरिबांपर्यंत पोहोचण्याऐवजी ते गोदामातून थेट खुल्या बाजारात चढ्या दराने विकल्याचे अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे ठाणे पोलिसांनी त्याच्यावर MPDA (Maharashtra Prevention of Dangerous Activities) कायद्यांतर्गत कारवाई करून त्याची कारागृहात रवानगी केली होती.

2 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का  
लखन पटेल आणि त्याच्या टोळीवर संघटितपणे रेशनिंग धान्याची चोरी आणि तस्करी केल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे. रेशनिंगच्या मालाची अफरातफर करण्यासाठी त्याने एक मोठी साखळी तयार केली होती, ज्यामध्ये अनेक वाहने आणि गोदामांचा वापर केला जात होता

3 जीवनावश्यक वस्तू कायदा रेशनच्या धान्याची अवैध साठवणूक आणि विक्री.भारतीय न्याय संहिता कलम ४२०, ४०६ फसवणूक आणि विश्वासघात करणे.

4 सरकारी कामात अडथळा अनेकदा कारवाईसाठी गेलेल्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावणे किंवा त्यांच्या कामात अडथळा आणल्याचे आरोपही त्याच्यावर आहेत.

5 ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि परिमंडळ-३ च्या पोलिसांनी वेळोवेळी त्याच्या गोदामांवर छापे टाकून लाखो रुपयांचा तांदूळ आणि गहू जप्त केला आहे. कोळसेवाडी, बाजारपेठ आणि खडकपाडा पोलीस ठाण्यांतर्गत त्याच्या विरुद्ध सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com