सावधान! वीज कनेक्शन खंडित होणार सांगत 20 सेकंदात वृद्धाच्या खात्यातून लुटले लाख रुपये

Kalyan Cyber Crime: तुमच्या घरातील वीज कनेक्शन बंद होणार असे सांगत एका वयोवृद्ध व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल 1 लाख 44 हजार रुपये लुटल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो

- अमजद खान

Kalyan Cyber Crime: ऑनलाइन फ्रोड करणाऱ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कित्येकांची ऑनलाइन फसवणूक करून त्यांना लाखो-कोट्यवधी रुपयांना गंडा घातला जात आहे. अशीच काहीशी घटना कल्याण शहरामध्येही घडली आहे. तुमच्या घरातील वीज कनेक्शन बंद होणार असे सांगत एका वयोवृद्ध व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल 1 लाख 44 हजार रुपये लुटल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नेमके काय घडले?

कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात जयराम जाधव (वय 67 वर्षे) हे मुलगी आणि नातीसोबत राहतात. जाधव यांना एका व्यक्तीने फोन करत तुमच्या घरातील वीज कनेक्शन बंद होणार, असे सांगितले. वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी तातडीने वीज बिल भरण्यासाठी एक मेसेजही पाठवला. घरामध्ये लहान मुलगी असल्याने जयराम जाधव घाबरले. वीज नसेल रात्र अंधारात काढावी लागेल, या भीतीपोटी जाधव यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला वीजबिल कसे भरायचे? अशी विचारणा केली. यानंतर समोरच्या व्यक्तीने ऑनलाइन पेमेंटद्वारे प्रथम 100 रुपये पाठवण्यास सांगितले. दोघांचे फोनवर संभाषण सुरू असतानाच जाधव यांच्या बँक खात्यातून अचानक 1 लाख 44 हजार रुपये वजा झाले. थोड्या वेळाने आपली फसवणूक झाल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. 

Advertisement

(नक्की वाचा: महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरण: अभिनेता साहिल खानला अटक, 40 तास पोलीस करत होते पाठलाग)

पोलिसात तक्रार केली दाखल   

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जयराम जाधव यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी जयराम जाधव यांचे बँक खाते गोठवले. बँक खाते गोठवले गेल्याने ऑनलाइन गंडा घालणाऱ्या भामट्यांना लुटलेले लाख रुपये डेबिट करणे जमले नाही. पुढील प्रक्रिया करून पोलिसांनी जयराम जाधव यांचे 1 लाख 44 हजार रुपये त्यांना मिळवून दिले. कष्टाने कमावलेली आयुष्याची कमाई मिळवून दिल्याने जाधव यांनी पोलिसांचे आभार मानले. 

Advertisement

(नक्की वाचा: संतापजनक! 12 वर्षीय मुलीवर बॉयफ्रेंडसह 4 अल्पवयीन मुलांनी केला गँगरेप, दगडाने ठेचून केली हत्या)

पोलिसांनी नागरिकांना केले आवाहन 

दरम्यान या घटनेच्या निमित्ताने तुम्हाला कुठून फोन येतात, कोणे मेसेज करते, समोरील व्यक्ती काय सांगतात; अशा कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना नागरिकांनी बळ पडू नये, असे आवाहन पुन्हा एकदा पोलिसांनी केले आहे. वारंवार आवाहन करूनही नागरिक सायबर गुन्ह्यांना बळी पडत असल्याची बाब दुर्दैवी आहे, याकडेही पोलिसांनी लक्ष वेधले. 

Advertisement

VIDEO: शरद पवारांचं वय पुन्हा चर्चेत येणार, सदाभाऊ खोतांनी...म्हातारं म्हणत केली टीका

Topics mentioned in this article