
मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचं असंवेदनशील वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटले होते. पाटील यांनी या हल्ल्याची तुलना करता बडे-बडे शहरों मे, छोटी छोटी बाते होती रहती है...' असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आर. आर. पाटील यांना राजीनामा द्यावा लागला होता. या घटनेसारखाच एक असंवदेनशील प्रकार शेजारच्या कर्नाटकमध्ये घडला आहे.
कर्नाटकची राजधानी बेंगळुरुमध्ये 4 एप्रिल रोजी दोन मुलींच्या छेडछाडीची घटना घडली होती. या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजनुसर एक व्यक्ती या दोन मुलींच्या जवळ गेला. त्यांनी एकीला धक्का दिला आणि तिथून पळून गेला. या प्रकरणात कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले गृहमंत्री?
कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांना या विषयावर प्रश्न विचारला त्यावर त्यांनी सांगितलं की, 'या प्रकारच्या घटना मोठ्या शहरात नेहमी होतात. या प्रकरणात जी काही कायदेशीर कारवाई करायची असेल ती कायदेशीर पद्धतीनं होईल. मी पोलीस संचालकांना पेट्रोलिंग वाढवण्याचे आदेश दिले आहेत.' त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे.
भारतीय जनता पार्टीनं गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका करत सिद्धरामय्या सरकारवर निशाणा साधला आहे. या व्हायरल व्हिडिओतून शहरातील कायदा आणि सूव्यवस्थेचं सत्य सर्वांसमोर आलं आहे. बेंगळुरु शहर हे दिवसोंदिवस महिलांसाठी असुरक्षित होत आहे.
( नक्की वाचा : पत्नीच्या हत्येसंबंधी पतीला जेल पण जबरदस्त ट्विस्ट, 4 वर्षांनी बायको बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये सापडली )
CCTV फुटेजमध्ये काय?
बेंगळुरुमधील भारती लेआऊटमध्ये 4 एप्रिल रोजी रात्री 1 वाजून 52 मिनिटांच्या आसपास ही घटना घडली. या घटनेनंतर दोन मुली रडत आणि ओरडत असल्याचं दिसत आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. त्यामध्ये रस्त्यावरुन जाणाऱ्या या एका अज्ञात व्यक्तींनी मुलींची छेडछाड काढली आणि तो तिथून पळून गेला.
बेंगळुरु पोलिसांनी या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु असून दोषी व्यक्तींना लवकरच पकडलं जाईल असं आश्वासन दिलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world