जाहिरात

Terrorism News: जन्मदातीच बनली 'जल्लाद'! 15 वर्षांच्या मुलाला ISIS दहशतवादी बनवण्याचा आईचा प्रयत्न

Mother radicalizes son : पोटच्या मुलाला दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी प्रेरित करणारी आई तुम्ही कधी पाहिली किंवा ऐकली आहे का?

Terrorism News: जन्मदातीच बनली 'जल्लाद'! 15 वर्षांच्या मुलाला ISIS दहशतवादी बनवण्याचा आईचा प्रयत्न
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

Mother radicalizes son : एखादी आई इतकी निर्दयी असू शकते की ती आपल्या पोटच्या गोळ्याला, ज्याचं आयुष्य अजून सुरू व्हायचं आहे, त्याला गुन्हेगारीच्या अशा वाटेवर ढकलते जिथे फक्त मृत्यू आहे? पोटच्या मुलाला दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी प्रेरित करणारी आई तुम्ही कधी पाहिली किंवा ऐकली आहे का? केरळमधून एक अतिशय सनसनाटी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका आईने आपल्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला दहशतवादी संघटना ISIS (इस्लामिक स्टेट) मध्ये सामील करण्याचा प्रयत्न केला.

काय आहे प्रकरण?

केरळ पोलिसांनी या प्रकरणी आईविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केली आहे. NDTV ला मिळालेल्या माहितीनुसार, या एफआयआरमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, मुलाची आई मुलाला कट्टरपंथी (Radicalize) बनवण्याच्या प्रयत्नात सक्रियपणे सहभागी होती. ती युनायटेड किंगडम (UK) मध्ये असलेल्या एका ISIS दहशतवाद्यासोबत मिळून काम करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या 15 वर्षांच्या मुलाला कथितरित्या ISIS च्या प्रचार सामग्रीच्या (Propaganda) संपर्कात आणले गेले. त्याला इतर धर्मांबद्दल द्वेष करण्याची शिकवण दिली गेली आणि दहशतवादी गटाची विचारधारा स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

( नक्की वाचा : Shocking News: नात्यांना कलंक! आईने नकार दिला आणि मुलाने तिची कवटी फोडली; संपूर्ण गाव स्तब्ध )
 

इस्लामचा सर्वात मोठा मार्ग' म्हणून हिंसेचे व्हिडिओ

केरळ पोलिसांनी याप्रकरणी UAPA (Unlawful Activities Prevention Act) कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केली असून त्यात दोन मुख्य आरोपींचा समावेश आहे. पहिला आरोपी अंजार नावाचा व्यक्ती आहे, जो कथितरित्या इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे आणि सध्या यूके (UK) मधील लीसेस्टर येथे राहत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजारने अल्पवयीन मुलाला त्याच्या लॅपटॉपवर ISIS च्या हत्याकांडाचे व्हिडिओ दाखवले. त्याने या संघटनेच्या विचारधारेला "इस्लामचा सर्वात मोठा मार्ग" असे सांगितले.

एफआयआर मध्ये म्हटले आहे की, अंजारने मुलाला ISIS स्वीकारण्यासाठी भडकावले आणि त्याला "इस्लामचा खरा मार्ग" म्हणून भासवले. इतकेच नाही तर इतर धर्मांच्या विरोधात शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याचाही त्याने प्रयत्न केला.

मुलाला दहशतवादी बनवणाऱ्या आईची ओळख

दुसरी आरोपी मुलाची आई फिदा मोहम्मद अली आहे. तपासकर्त्यांच्या माहितीनुसार, तिने मुलाला कट्टरपंथेकडे ढकलण्याच्या प्रयत्नांना पूर्णपणे पाठिंबा दिला. एफआयआर मध्ये नोंद आहे की, फिदा मोहम्मद अलीने कथितपणे अंजारसोबत मिळून हे काम केले. पोलीस सूत्रांनुसार, या दोन्ही आरोपींनी एकत्र येऊन अल्पवयीन मुलावर प्रभाव टाकला, त्याचे मार्गदर्शन केले आणि त्याला कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न केला असा प्राथमिक अंदाज आहे.

 NIA करणार तपास

केरळ पोलिसांना असे वाटते की हे प्रकरण एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कशी जोडलेले असू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या काही भागात या दहशतवादी गटाशी संबंधित काही गुप्त घटक (Secret Elements) सक्रिय असू शकतात, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन एनआयए (NIA - National Investigation Agency) ने आता तपास सुरू केला आहे आणि लवकरच ते संपूर्ण तपास स्वतःच्या हातात घेण्याची तयारी करत आहेत. अधिकार क्षेत्रात बदल झाल्यावर, कोची एनआयए कार्यालय यासंदर्भात एक नवी एफआयआर दाखल करेल आणि संपूर्ण तपासाची सूत्रे ताब्यात घेईल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com