
Shocking News: 55 वर्षांच्या महिलेने आपल्याच अल्पवयीन पतीने केलेल्या लग्नाच्या विरोधानंतर त्याला आपल्या मुलगा आणि जावयाच्या मदतीने बेल्टने मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पीडित पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये हा धक्कादायक आणि विचित्र प्रकार घडलाय. या 'अजब' कौटुंबिक वादाची सध्या शहरात चर्चा सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार लखनौमधील महबूबगंज येथील रहिवासी असलेल्या जीशान अन्सारी या तरुणाने पोलिसांत याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार 7 वर्षांपूर्वी बेबी नावाच्या महिलेने त्याच्याशी जबरदस्तीने लग्न केले. त्यावेळी जीशानचे वय केवळ 17 वर्षे होते, तर बेबीचे वय 55 वर्षे होते. जीशानचा आरोप आहे की, त्याला धमकावून हे लग्न लावून देण्यात आले होते. कालांतराने, या दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि गेल्या 5 महिन्यांपासून ते दोघे वेगळे राहत होते.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यात सर्वात मोठी दहशतवादविरोधी कारवाई; कोथरूडच्या एका साध्या चोरीने दहशतवादी जाळे कसे उघड केले? )
मुलगा आणि जावयाकडून मारहाण
पीडित जीशानने केलेल्या तक्रारीनुसार, 6 ऑक्टोबरच्या संध्याकाळी सुमारे 5:30 वाजता तो अंबरगंज येथील अहसन सभासद यांच्या कार्यालयाजवळून जात असताना, त्याची पत्नी बेबीचा मुलगा फैसल आणि जावई सद्दाम यांनी त्याला अडवले. त्यांनी जीशानच्या बाईकची चावी हिसकावून घेतली आणि त्याला बेल्टने बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असाही जीशानचा आरोप आहे.
पोलिसांत तक्रार दाखल
या घटनेनंतर जखमी झालेल्या जीशान अन्सारीने सआदतगंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
एका बाजूला प्रौढ महिला आणि दुसरीकडे अल्पवयीन पती यांच्यातील हा अनोखा वाद सध्या संपूर्ण परिसरात उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world