सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune Mahalunge Robbery News : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या एका महिलेला 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी महिलेने बनावट चावीचा वापर करून फिर्यादीच्या घरातून जवळपास 13,87,000 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरले. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारिका संतोष भुजबळ असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे.
भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांनी तपासाचे आदेश दिले होते.तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली.त्यामध्ये एका महिलेचा संशयास्पद वावर दिसून आला.तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सारिका संतोष भुजबळला ताब्यात घेतले.
नक्की वाचा >> Shocking news: 'मार्क्स वाढवायचेत', प्रिंसिपलचा विद्यार्थीनीला भयंकर प्रस्ताव, फ्लॅटवर नेले पण त्याच वेळी...
घराच्या दरवाजाची बनावट चावी बनवून घेतली अन्...
पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.आरोपी महिला ही फिर्यादीच्या ओळखीची होती,त्यामुळे तिला घरातील दागिन्यांची पूर्ण कल्पना होती. तिने घराच्या दरवाजाची बनावट चावी बनवून घेतली होती.संधी मिळताच तिने घरात प्रवेश करून कपाटातील दागिने लंपास केले.महिलेला अटक केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्याकडून चोरीला गेलेले सर्व 10 तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत.mमहाळुंगे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या गुन्ह्याचा छडा लावल्याने नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.