जाहिरात

Uran Crime: आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला! लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, कुठे घडली घटना?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंचांचे हत्याकांड चर्चेत असतानाच उरण पागोटेचे सरपंच कुणाल पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे सरपंचाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Uran Crime: आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला! लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, कुठे घडली घटना?

राहुल कांबळे, मुंबई:

बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली व संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली. ही घटना ताजी असतानाच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पागोटे येथे अशाच घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंचांचे हत्याकांड चर्चेत असतानाच उरण पागोटेचे सरपंच कुणाल पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे सरपंचाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 पागोटे गावचे सरपंच कुणाल अरुण पाटील (वय २८ ) गावात त्यांच्या कुटुंबासह राहतात. ते सरपंच असून त्यांचे मे. एक्सप्रेस लॉजिस्टिक नावाने कंपनी कार्यरत आहे. सरपंच कुणाल पाटील हे अनेकवर्षे गावात व गावच्या आजूबाजूच्या परिसरात समाजप्रबोधनाची कामे करतात. व्यावसायिक कामे, शिवसेना शाखेची कामे व समाजप्रबोधनाची कामे हे नवघर कुंडेगाव रस्त्यावर ता- उरण, जिल्हा रायगड येथील कंटेनर केबिनच्या ऑफिसमधून करीत असतात.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिनांक ९/१०/२०२४ रोजी दुपारी ३ वाजताचे सुमारास सरपंच कुणाल पाटील हे कुंडेगाव नवघर रस्त्याच्या बाजूला असलेल्या कंटेनर ऑफिसमध्ये काम करीत असताना काही इसम आरडा ओरड करत ऑफिसच्या बाहेर आले व त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत, धमकी देत सरपंच कुणाल पाटील व त्यांच्या दोन साथीदारांवर जीवघेणा हल्ला केला. जीवे मारण्यासाठी आलेले इसमांनी लाथा बुक्क्यानी मारहाण केली. बंदुके व तलवारीही त्यांनी सोबत आणली होती.

मात्र सिसिटीव्ही कॅमेरा असल्यामुळे सदर इसमानी आपली हत्यारे लपविली. सिसिटीव्ही कॅमेरे पाहताच आरोपीनी तेथून लगेच पळ काढला. जीवघेणा हल्ला झाल्याने सरपंच कुणाल पाटील व त्यांचे दोन साथीदार यांनी लगेचच इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय उरण येथे जाऊन त्वरित उपचार घेतले.  या सर्व घडामोडी लक्षात घेता सरपंच पदावर काम करणाऱ्या व्यक्तींची सुरक्षितता पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाचे सरपंचांच्या अशा घटनेकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा पुन्हा असे प्रकार होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेवर आता पुन्हा एकदा संशय निर्माण झाला आहे.

नक्की वाचा : (भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारे महर्षी हरपले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन )


या संदर्भात सरपंच कुणाल पाटील यांच्या जीवितेला धोका निर्माण झाला असून स्वतःच्या सुरक्षेसाठी व हत्त्या करण्यासाठी आलेल्या संबंधित इसमावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना अटक व्हावी या उद्देशाने पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच कुणाल पाटील यांनी पागोटे येथे पत्रकार परिषद घेतली व पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याबाबत माहिती दिली. व ज्या इसमानी, गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला त्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई करून त्वरित अटक करावी अशी मागणी केली.

दुसरीकडे  तुळजापूरमध्येही असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. मेसाई जवळगा येथील सरपंचांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ले करून पेट्रोलचे पाकीट फेकत अंडी फोडली व जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com