Beed News : बीड बस स्थानक परिसर हादरलं..रात्री 2 वाजता घडली भयंकर घटना! संपूर्ण शहरात पोलीस अलर्ट मोडवर

 बीड शहरातील बस स्थानक परिसरात एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Beed Crime News Today

आकाश सावंत, प्रतिनिधी 

Beed Crime News :  बीड शहरातील बस स्थानक परिसरात एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.गांधीनगर भागात राहणारा नौशाद नावाचा तरुण बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या एका पत्र्याच्या जवळ मृत अवस्थेत आढळून आला. डोक्यावर दगडाने वार करून नौशादची हत्या करण्यात आली,असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी तो जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.नौशाद हा काल रात्री उशिरापर्यंत आपल्या दोन मित्रांसोबत बस स्थानक परिसरात बसून नशा करत होता, असं बोललं जात आहे. दरम्यान, पोलिसांनी त्या दोन्ही मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे.

नक्की वाचा >>  Akola News: अकोला महापालिकेत शिवसेना ठाकरे गटात मोठी खळबळ, 25 जण राजीनामा देण्याच्या तयारीत, कारण काय?

शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

दरम्यान, ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली,यामागे वैयक्तिक वाद आहे की इतर कोणता मुद्दा आहे,याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.घटनास्थळावरील परिस्थिती आणि मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे बस स्थानक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नक्की वाचा >> Pune News : बारामतीत सुरु होता सर्वात घाणेरडा प्रकार, भिगवण रोडवरील 'त्या' लॉजवर छापा, परिसरात उडाली खळबळ