जाहिरात

आता सहन होत नाही !...चिठ्ठीत पत्नीबद्दल भयानक खुलासे करत तरुणाने संपवलं जीवन

मृत तरुणाचे वडील जेव्हा घटनास्थळी पोहोचले होते तेव्हा त्यांचा मुलगा बेशुद्धावस्थेत सापडला होता. बायकोशी भांडण झाल्याने मुलाने विष प्यायले होते आणि त्यामुळे त्याची शुद्ध हरपली होती.

आता सहन होत नाही !...चिठ्ठीत पत्नीबद्दल भयानक खुलासे करत तरुणाने संपवलं जीवन

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अहमदाबाद जिल्ह्यातील ढोलकामध्ये 35 वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवले. आपल्या पत्नीचे तिच्याच भावासोबत अनैतिक संबंध असल्याचं या तरुणाला कळालं होतं. याच कारणामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालंय. मृत तरुणाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सदर प्रकरणाचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली आहे.

नक्की वाचा :रात्रीची पार्टी जीवावर बेतली, गजानन काळेंचा मृत्यू

मृत तरूणाच्या वडिलांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलाचं 2009 साली लग्न झालं होतं. ढोलकातीलच महिलेशी त्याचं लग्न झालं होतं मात्र 2017 साली या दोघांचा घटस्फोट झाला होता. यानंतर मुलगा आपल्यापासून वेगळा राहू लागला होता आणि आमच्याशी त्याचे संबंध पूर्वीसारखे राहीले नव्हते असे वडिलांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे. वडिलांनी वर्तमानपत्रात आपले आणि आपल्या मुलाचे कोणतेही संबंध राहीलेले नाहीत अशी जाहिरातही प्रसिद्ध केली होती.

नक्की वाचा :समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, डिव्हायडरला आदळल्यानंतर कार पेटली; महिलेचा मृत्यू

तक्रारदाराने म्हटले आहे की त्यांच्या मुलाने दुसरे लग्न केले होते. ज्या महिलेशी त्याने लग्न केले होते त्या महिलेने 4 लग्न केली होती आणि चारहीवेळा तिने घटस्फोट घेतला होता. लग्नानंतर हे दोघे ढोलकामध्ये राहात होते. पोलिसांनी सदर प्रकरणाबद्दल माहिती देताना सांगितले की ढोलका पोलीस ठाण्यात एक फोन आला होता. फोन करणाऱ्याने आपल्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मृत तरुणाचे वडील जेव्हा घटनास्थळी पोहोचले होते तेव्हा त्यांचा मुलगा बेशुद्धावस्थेत सापडला होता.  बायकोशी भांडण झाल्याने मुलाने विष प्यायले होते आणि त्यामुळे त्याची शुद्ध हरपली होती. 7 नोव्हेंबरला या तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या वडिलांनी सांगितले की त्यांना मुलाच्या पँटच्या खिशातून एक चिठ्ठी सापडली होती. यात त्याने त्याला होत असलेल्या त्रासाबद्दल लिहिले होते. या तरुणाने लिहिले होते की त्याच्या बायकोचे आणि तिच्या सख्ख्या भावाचे शारिरीक संबंध होते. या दोघांना त्याने रंगेहाथ पकडले होते. यानंतर संपातपलेल्या बायकोने आणि तिच्या भावाने या तरुणाला बेदम मारहाण केली होती. हा धक्का सहन न झाल्याने या तरुणाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  मृत तरुणाच्या बायकोने चार वेळा लग्न केले होते आणि चारही नवऱ्यांना तिचे आणि तिच्या भावाचे असलेले संबंध याबाबत कळालं होतं. यामुळेच त्यांनी तिच्यापासून घटस्फोट घेतला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com