जाहिरात

राज्यात आणखी एक हिट अँड रन; ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा मर्सिडीज कार धडकेत मृत्यू

नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात मर्सिडीज कार चालकाच्या विरोधात हिट एन्ड रनचा गुन्हा दाखल केला.

राज्यात आणखी एक हिट अँड रन; ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा मर्सिडीज कार धडकेत मृत्यू
ठाणे:

नाशिक - मुंबई महामार्गावर मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्सिडीज आणि थार या दोन चारचाकी वाहनांपैकी मर्सिडीज कारने नितीन कंपनी जंक्शनवर दुचाकी स्वाराला धडक देऊन पोबारा केल्याची घटना सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी पहाटे 1.50 वाजण्याच्या सुमारास घडली. दुचाकीस्वार 21 वर्षीय तरुण दर्शन शशीधर हेगडे याचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.

ओलामधून पत्नीचा मृतदेह आणला अन् मोठ्या फ्रीजमध्ये ठेवला; मृत्यू प्रमाणपत्रावरुन पतीचं बिंग फुटलं!

नक्की वाचा - ओलामधून पत्नीचा मृतदेह आणला अन् मोठ्या फ्रीजमध्ये ठेवला; मृत्यू प्रमाणपत्रावरुन पतीचं बिंग फुटलं!

या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात मर्सिडीज कार चालकाच्या विरोधात हिट एन्ड रनचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही आरटीओ,सी.डी.आर च्या मदतीने तसेच दोन टीमच्या साहाय्याने नौपाडा पोलीस फरार वाहन चालकाचा शोध घेत आहे. तसेच मर्सिडीज कार मुलुंड येथील बृहन्मुंबईच पे अँड पार्क वाहन तळावर पार्क करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.