Kalyan CCTV Video Viral : कल्याण शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्राहक असल्याचे भासवून एका व्यक्तीने रिक्षात प्रवास केला आणि संधी साधून रिक्षाचालकाचा मोबाईल फोन तसेच पैशांची रोकड घेऊन पसार झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आधी ग्राहक बनला आणि तो रिक्षा थांबवून त्यात बसला. त्यानंतर योग्य संधी मिळताच त्याने रिक्षाचालकाचा मोबाईल आणि रोकड लंपास केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर रिक्षाचालकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्याआधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
नक्की वाचा >> Vaibhav Sooryavanshi : भारतीय संघात वैभव सूर्यवंशीला जागा मिळणं कठीण,आकाश चोप्राने सांगितली यामागची सर्व कारणे
नागरिक आणि रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण
— Naresh Shende (@NareshShen87640) June 4, 2026
पोलिसांकडून परिसरातील इतर कॅमेऱ्यांचीही तपासणी केली जात आहे. दिवसाढवळ्या भर रस्त्यात आणि नागरिकांची वर्दळ असताना घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.अशा घटना वाढत असल्याने नागरिक आणि रिक्षाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे शहरात पोलिसांचा धाक उरला आहे का,असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून तपास पुढे सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world