मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला असला तरीही अद्याप आरोपींना शिक्षा देण्यात न आल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली, त्याचा व्हिडिओही शूट करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणात सत्ताधारी नेत्यांसह विरोध एकत्र आले असून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा देण्याची मागणी करीत आहे.
घटनाक्रम पुढीलप्रमाणे, आतापर्यंत नेमकं काय झालं ? -
9 डिसेंबर रोजी तीन वाजता अपहरण करत 7 वाजता हत्या झाल्याचं वृत्त समोर आलं.
9 डिसेंबर रोजी रात्रभर ग्रामस्थ केज मांजरसुंबा रोडवर ठिय्या देऊन बसले होते.
10 दहा डिसेंबर रोजी सकाळपासून पुन्हा ग्रामस्थांनी रोडवर ठिय्या आंदोलन केले.
जरांगे पाटलांनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा अशी मागणी करण्यात आली होती ती मान्य करण्यात आली. पुढे या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून केली अटक..
सायंकाळच्या वेळी पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत ग्रामस्थांच्या मागण्या मान्य केल्या, यानंतर 11 वाजता आंदोलन मागे घेण्यात आलं.
10 डिसेंबरला रात्री दोन वाजता संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
11 डिसेंबरला केज पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणात विष्णू चाटे, सुदर्शन घुले, आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल.
या प्रकरणात पोलिसांनी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे यांना आतापर्यंत अटक करण्यात आली.
सीआयडीचे महासंचालक प्रशांत बुर्डे दोन दिवसांपासून बीडमध्ये ठाण मांडून.
सीआयडीकडे गुन्हा वर्ग केल्यानंतर सीआयडीचे महासंचालक स्वतः बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाले.
नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पदभार घेताच घेतली देशमुख कुटुंबाची भेट. पुढे सीआयडीचे वरिष्ठ महासंचालक थेट केजमध्ये पोहोचले आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन चौकशी केल्याची माहिती आहे.
चार तास पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत बैठक पार पडली.
केज पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले, 9 डिसेंबरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.
सलग दुसऱ्या दिवशी देखील सीआयडीचे महासंचालक बीडमध्ये दाखल. प्रशांत बोर्डे दुसऱ्या दिवशी बीडच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये पोहचले. त्यांनी आरोपी विष्णू चाटे याची एक तास चौकशी केल्याची माहिती अटकेत असलेल्या इतर आरोपींचीही सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केल्याची माहिती.
मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थी नंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेऊन सरपंच देशमुख यांच्या मृतदेहावर 24 तासानंतर अंत्यसंस्कार केले.
11 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिक घुले याला पुण्यातील रांजणगाव येथून अटक केली.
नक्की वाचा - Beed Crime : धनंजय मुंडेंना घेरलं, करुणा मुंडे उतरल्या मैदानात; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव
11 डिसेंबर रोजी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करत थेट वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करत यांना दोषी ठरवले.
तर सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यातील राक्षसी प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करत असून कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली.
11 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, अजित पवार गटाचे केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
12 डिसेंबर रोजी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील. त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाईची मागणी केली.
13 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.
नक्की वाचा - Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणी SIT मधील 'त्या' वादग्रस्त अधिकाऱ्यांना हटवलं!
तर त्याच 13 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.
14 डिसेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.
14 डिसेंबर रोजी आरोपी विष्णू चाटे याची अजित पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली.
या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा यांनी यात न्यायाची मागणी केली.
18 डिसेंबर रोजी देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याला अटक करण्यात आली.
19 डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आला. यात त्यांच्या अंगावर 56 जखमा आढळून आल्या आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.
21 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली झाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला..
21 डिसेंबर रोजी शरद पवार त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले..
तर 21 डिसेंबर रोजी नवनीत कावत यांची पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली..
24 डिसेंबर रोजी मसाजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की येथे झालेल्या मारहाण तसेच खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला..
28 डिसेंबर रोजी तीन आरोपींच्या अटकेच्या मागणीसह वाल्मीक कराड यांच्यावर या प्रकरणात गुन्हा नोंदवून अटक केली जावी.. या मागणीसाठी सर्वपक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला..
27 डिसेंबरला वाल्मिक कराड यांच्या पत्नी कराड यांची सीआयडी कडून तीन तास पासून चौकशी. याचवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील चौकशी.
आरोपीच्या अटकेसाठी 28 तारखेला आक्रोश मोर्चा मोर्चा.
आतापर्यंत खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या पत्नीचे मंजली कराड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, दोन अंगरक्षक,राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, यांच्यासह आणखी चार ते पाच महिलांची सीआयडीने चौकशी केली आहे. तसेच केज 50 ते 60 व्यक्तींची चौकशी केल्याचे देखील माहिती आहे.
3 जानेवारीला अनेक दिवासांपासून फरार असलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला ताब्यात घेण्यात आले.
4 जानेवारीला संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा
5 जानेवारीला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी यासाठी पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.
6 जानेवारीला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटीतील तिघांना हटवण्यात आले. एपीआय महेश विघ्ने, हवालदार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला SIT मधून हटवण्यात आलं. यांचे आणि वाल्मिक कराडचे संबंध असल्याच्या आरोपानंतर हे पाऊल उचलण्यात आलं.
7 जानेवारीला धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. याशिवाय धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आले.
8 संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world