
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेशच्या मेरठमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दौराना भागात एका लग्नसोहळ्यात नवरदेव मंडपात येताच मुलीच्या वडिलांनी नवरीचा मृत्यू झाल्याचे सांगितले ज्यानंतर एकच गोंधळ उडाला. मात्र नवरीच्या वडिलांच्या बोलण्याचा नवरदेवाला संशय आला ज्यानंतर तपासात धक्कादायक सत्य समोर आल्याने सगळेच हादरुन गेले. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उत्तर प्रदेशातील मेरठमधून लग्नाची एक अजब बातमी आली आहे. इथे दारोला भागात नवरी लग्नाआधी तयारीसाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. पण ती तिथून ती घरी न येता तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. जेव्हा वधू घरी पोहोचली नाही तेव्हा कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला, त्यानंतर त्यांना मुलगी पळून गेल्याचे समजले. आता आपली बदनामी होईल याच्या भितीने त्यांनी नवरदेवाला खोटे सांगतिले.
वधूचे वडील म्हणाले आमची मुलगी अपघातात वारली. हे ऐकून वराच्या कुटुंबाला धक्का बसला. पण वराला त्याच्या सासऱ्यांच्या बोलण्यावर थोडा संशय आला. जेव्हा त्याने चौकशी केली तेव्हा वधूचा मृत्यू झाला नसल्याचे समोर आले. उलट, ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. हे कळताच वर आणि त्याची आई दोघेही बेशुद्ध पडले. यानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. जिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. या लग्नाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
नक्की वाचा - Amravati Airport : रेल्वेपेक्षा विमानाने करा प्रवास, अमरावती-मुंबई विमानाचं तिकीट दुरांतो एक्सप्रेसपेक्षा स्वस्त
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ग्रेटर नोएडामध्ये लग्नाच्या 8 दिवस आधी दोन वधू त्यांच्या प्रियकरांसह पळून गेल्या. मग तिच्याशी लग्न केले. जेव्हा तिला पकडण्यात आले तेव्हा तिने तिच्या पालकांच्या वरांच्या निवडीबद्दल असे गुपित उघड केले की पोलिसही थक्क झाले. तिला तिच्या पालकांच्या पसंतीच्या मुलांशी लग्न का करायचे नव्हते हे सांगितले.
Amravati Airport : अमरावती विमानतळ नामांतर, प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज कोण आहेत?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world