जाहिरात

Crime News : रिद्धपूरमध्ये आश्रम पार्ट 2, लैंगिक शोषणानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती; 75 वर्षांच्या महंताचं किळसवाणं कृत्य

रिद्धपूर येथील एका आश्रमात महतांकडून 17 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 

Crime News : रिद्धपूरमध्ये आश्रम पार्ट 2, लैंगिक शोषणानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती; 75 वर्षांच्या महंताचं किळसवाणं कृत्य

गेल्या अनेक वर्षांमध्ये देशातील अनेक आश्रमांमध्ये संतापजनक घटना समोर आल्या आहेत. ज्यांना वाकून नमस्कार केला जातो असे संतच महिलांची अब्रु लुटत असल्याचं दिसून आलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  रिद्धपूर येथील एका आश्रमात महतांकडून 17 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे सुरेंद्र मुनी तळेगावकर यांच्या मठात 17 वर्षी युवतीवर अत्याचार करण्यात आला. गेल्या अनेक महिन्यांपासून या तरुणीवर अत्याचार सुरू होते. सुरेंद्र मुनी तळेगावकर (वय 75 ) वर्ष आणि बाळासाहेब देसाई (40) या दोघांनी एका मावशी मार्फत या युवतीला बोलवून घेतलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं. या अत्याचारातून मुलीला 8 महिन्यांची गर्भधारणा झाली.

Satara Crime : आरोपी तलवारीसह पोलीस ठाण्यात, चौकशीसाठी आलेल्या तरुणाने जीवन संपवलं; हैराण करणारं प्रकरण 

नक्की वाचा - Satara Crime : आरोपी तलवारीसह पोलीस ठाण्यात, चौकशीसाठी आलेल्या तरुणाने जीवन संपवलं; हैराण करणारं प्रकरण 

त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या अत्याचाराबद्दल पीडित मुलीने तिच्या मावशीला दिली. मात्र मावशीने तिला गप्प राहण्यास सांगितलं. शिरखेड पोलिसांनी तिन्ही आरोपींवर बलात्काराच्या गुन्ह्यासह पोस्कोचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. याशिवाय तिघांनाही अटक करण्यात आली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: