मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू मारहाणीमुळे, PM रिपोर्टमुळे प्रकरणाला वेगळं वळण

अकोल्यातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. जय मालोकार यांच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
अकोला:

अकोल्यातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. जय मालोकार यांच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालंय. 30 जुलै रोजी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरीमध्ये जोरदार राडा झाला होताय. मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींची गाडी फोडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या वीस कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता.

जय हा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष होता. परभणी येथे होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता. मिटकरींसोबत झालेल्या राड्याच्या ताणातूनच जयचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेने गेला होता. जयच्या मृत्यूनंतर राज आणि अमित ठाकरेंनी अकोल्यात त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. राडा झाल्यानंतरच्या तीन तासांत जयसोबत नेमकं काय झालं होतं? याची चौकशी करण्याची मागणी जयच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. या  प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. याशिवाय आमच्या जीवाला धोका असल्याची भीती मालोकार कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. 

Advertisement

नेमकं प्रकरण काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावरुन राज ठाकरेंनी अजित पवारांवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा उल्लेख सुपारीबाज असा केला होता. यानंतर संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात जय मालोकर याचा समावेश होता. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात; डोक्याला गंभीर दुखापत, ICU मध्ये उपचार सुरू

काय म्हटलंय जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात?

  • जयला जबर मारहाण झाली. पाठीवर छातीवर डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण. 
  • छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर आहेत. 
  • याव्यतिरिक्त डोक्यालाही गंभीर मारहाण झालेली आहे. पोस्टमार्टमवेळी मेंदूवर मोठ्या प्रमाणात सूज. त्यामुळे मेंदूचे वजन वाढलं. 
  • मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूना गंभीर इजा
  • या सर्व गोष्टींमुळे त्याचा शेवटी 'न्यूरोजनिक शॉक'मुळे मृत्यू झाला.

नक्की वाचा - एक देश, एक निवडणूक प्रस्तावाला केंद्र सरकारची मान्यता! वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

कोण आहे मरण पावलेला मनसे कार्यकर्ता जय मालोकार?

  • जय मालोकार मनसेच्या विद्यार्थी आघाडीचा अकोला जिल्हा उपाध्यक्ष. 
  • परभणी येथे होमिओपॅथी मेडिकल शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता. 
  • अकोल्यातील उमरी भागात वास्तव्यास.
  • गेल्या पाच वर्षांपासून तो मनसेमध्ये सक्रियपणे कार्यरत होता.