जाहिरात

Hingoli News: आईने दिली पोटच्या पोराला संपवण्याची सुपारी, पोलीस तपासात हत्येमागचं संतापजनक कारण आलं समोर

हिंगोलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.अनैतिक संबंधांमध्ये  अडथळा ठरत असलेल्या मुलाचा आईनेच काटा काढला.

Hingoli News: आईने दिली पोटच्या पोराला संपवण्याची सुपारी, पोलीस तपासात हत्येमागचं संतापजनक कारण आलं समोर
Mother Killed Son In Hingoli

समाधान कांबळे, प्रतिनिधी 

Hingoli Crime News : हिंगोलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.अनैतिक संबंधांमध्ये  अडथळा ठरत असलेल्या मुलाचा आईनेच काटा काढला. प्रियकराला सुपारी देऊन पोटच्या मुलाचा खून केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. ही घटना हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील उमरदरी शेत शिवारामध्ये घडली. याप्रकरणी हिंगोली पोलिसांनी वेगाने तपास करत 48 तासांच्या आत आरोपी आईसह इतर 2 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

प्रियकराच्या मदतीने मुलाची केली हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, 8 एप्रिल रोजी अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली आहे. सचिन राजगुरू असे या मृत तरुणाचं नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वढव या गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आलीय.

नक्की वाचा >> Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं टेन्शन वाढलं, पोलिसांनी पुण्याच्या पत्त्यावर धाडली 'ही' नोटीस

या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी कसून तपास केला. आईच्या अनैतिक संबंधांमध्ये मुलगा अडथळा ठरत असल्याने आईनेच पोटच्या मुलाला प्रियकराच्या मदतीने 25 हजाराची सुपारी देऊन मुलाला संपवून टाकलं. हिंगोली पोलिसांनी या प्रकरणात तपासचक्रे फिरवत अवघ्या 48 तासांच्या आत आरोपी आईसह इतर दोन आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी दिली आहे. 

नक्की वाचा >> Dombivli News: गावदेवीच्या जत्रेसाठी बकरा दिला नाही..अख्ख्या कुटुंबाला मारहाण, डोंबिवलीतील धक्कादायक घटना


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com