
Crime News: उत्तरप्रदेशमधील झाशीमध्ये पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह पंख्याला लटकावून आत्महत्येचा बनाव रचल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मात्र मुलीने काढलेल्या एका चित्रामुळे वडिलांच्या क्रुर कृत्याचा उलगडा झाला. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मध्य प्रदेशातील टिकमगढ जिल्ह्यातील लिधौरा गावातील रहिवासी संजीव त्रिपाठी यांनी 2019 मध्ये त्यांची मुलगी सोनाली हिचे लग्न झाशीच्या समथर पोलीस स्टेशन परिसरातील नया बस्ती येथील रहिवासी संदीप बुधौलियाशी केले होते. संदीप हा एमआर होता आणि आपली पत्नी आणि मुलीसह पंचवटी शिव परिवार कॉलनीत राहत होता.
सोमवारी अचानक सोनालीच्या सासरच्या मंडळींनी तिच्या आई वडिलांना फोन करुन तिने आत्महत्या केल्याचे सांगितले. ही बातमी ऐकून सोनालीच्या आई- वडिलांना धक्काच बसला. मात्र त्यांनी ही आत्महत्या नसून आपल्या मुलीची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला होता. अशातच सोनालीची चार वर्षांची मुलगी दक्षिताने याबाबत धक्कादायक खुलासा केला.
(नक्की वाचा- Crime News : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' भाषणासाठी विद्यार्थिनीला पुरस्कार, काही दिवसात शिक्षकानेच केला अत्याचार)
प्रथम पप्पांनी मम्मीला मारले. नंतर पप्पांनी तिला फाशी दिली. फाशी दिल्यानंतर त्यांनी तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. नंतर तिला एका पोत्यात बंद केले आणि फेकून दिले, असा खुलासा या मुलीने केला. तसेच आईसोबत घडलेली सर्व घटना तिने पेपरवर चित्राद्वारे रेखाटूनही दाखवली, ज्यामुळे या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला.
याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे लग्नानंतर संदीप आणि त्याच्या सासरच्या लोकांनी हुंडा म्हणून सोनालीच्या कुटुंबियांकडे कारची मागणी करण्यास सुरुवात केली होती. मागणी पूर्ण न झाल्याने तिला मारहाण तसेच विविध प्रकारचे छळ करून त्रास देण्यात आला होता. याप्रकरणी तिच्या कुटुंबियांनी पोलीसात तक्रारही दिली असल्याचे उघडकीस आले आहे.
कळंबमधील बाई... संतोष देशमुखांच्या बदनामीचा कट; सुरेश धस यांनी सगळा प्लॅन सांगितला
तसेच मुलीच्या वडिलांनी सांगितले की, लग्नाच्या दिवशीच टिळक समारंभ होता. ज्यामध्ये त्याला 20 लाख रुपये रोख दिले होते आणि अंगठी आणि साखळीही दिली होती. मात्र लग्नादरम्यानच त्याने वाद निर्माण केला होता परंतु नातेवाईकांच्या आग्रहास्तव तो शांत झाला. त्यानंतर त्याने चारचाकी गाडीची मागणी करण्यास सुरुवात केली.
सोनालीला मुलगी झाल्यानंतरही त्यांनी मुलगा का झाला नाही म्हणून तिला मारहाण केली होती. दरम्यान, शवविच्छेदनानंतर पतीला अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world