
मुंबई: मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी आज राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवा खुलासा केला असून देशमुख यांना बदनाम करण्याचा कट आखला होता, मात्र पोलिसांचा तो डाव फसल्याचे म्हटले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले सुरेश धस?
याबाबत बोलताना सुरेश धस म्हणाले की, संतोष देशमुखला उचलून कळंबला न्यायचे. त्या ठिकाणी एक महिला तयार करून ठेवली होती. त्या महिलेसोबत संतोष देशमुख झटापट झाल्याचे भासवायचं आणि म्हणूनच महिलेचा विनयभंग केला असल्याचे म्हणत आम्ही याला मारले याचे समर्थन करायचे अशा प्रकारचा प्लान होता. मात्र आधीच संतोष देशमुख चा अंत झाला त्यामुळे त्याच्या बदनामीचा प्लॅन फसला, असा खळबळजनक खुलासा धस यांनी केला.
त्याचबरोबर संतोष देशमुख खून प्रकरणात जीएसटी नेमण्यात आली आहे त्या एसआयटीमध्ये दोन सायबर सेलच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. काही आरोपींनी दहा तारखेच्या नंतर आपले मोबाईल बंद करून ते गोदावरी नदीमध्ये फेकलेत त्यामुळे अडचणी येत आहे अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासाला विलंब लागला आहे आणि त्यांच्या विलंबाला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी. कारण महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी आता सापडण्याची आशा आहे, अशी मागणी केल्याचेही धस यांनी सांगितले.
(नक्की वाचा- Crime News : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' भाषणासाठी विद्यार्थिनीला पुरस्कार, काही दिवसात शिक्षकानेच केला अत्याचार)
धनंजय देशमुख यांचाही खळबळजनक दावा!
सुरेश धस यांच्याप्रमाणेच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनीही पोलिसांनी त्यांची बदनामी करण्याचा कट रचला होता, असा खुलासा केला आहे. बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर तो केज ऐवजीकळंब च्या दिशेने घेऊन जाण्याचा व त्या ठिकाणी एका महिलेच्या माध्यमातून या प्रकरणाला वेगळेच वळण देण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र पोलीस व्हॅनच्या मागे गावातील तरुणांच्या गाड्या असल्याने हा प्लॅन फसल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world