जाहिरात

UP Crime: असहाय्य तरुण- तरुणी, नराधमांनी विवस्त्र केलं, व्हिडिओ काढले अन्... संतापजनक घटना

दोघांच्या असाह्यतेचा फायदा घेत नराधमांनी त्यांना मारहाण केली तसेच पैसेही लुटले. मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून पोलीस अधिक्षकांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. 

UP Crime: असहाय्य तरुण- तरुणी, नराधमांनी विवस्त्र केलं, व्हिडिओ काढले अन्... संतापजनक घटना

मध्यप्रदेश: धबधब्यावर फिरायला गेलेल्या तरुण-तरुणीला विवस्त्र करुन त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याचा संतापजनक प्रकार मध्यप्रदेमधून
समोर आला आहे. या दोघांच्या असाह्यतेचा फायदा घेत नराधमांनी त्यांना मारहाण केली तसेच पैसेही लुटले. मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून पोलीस अधिक्षकांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मध्यप्रदेशातील रिवा येथील पूर्वा धबधब्यावर फिरायला आलेल्या तरुण- तरुणीला मारहाण करत, त्यांचे आक्षेपार्ह
व्हिडिओ बनवून लुटल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या नराधमींनी तरुण- तरुणीला विवस्त्र करुन त्यांना मारहाणही केली. याप्रकाराने घाबरुन गेलेल्या दोघांनी हात जोडत व्हिडिओ न काढण्यासाठी गयावया केल्या मात्र आरोपींनी त्यांना धमकावत पैसे लुटले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हा व्हिडिओ सेमारिया पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या पूर्वा फॉल्सच्या आसपासचा किंवा लाल गाव पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या क्योती फॉल्सच्या आसपासच्या जंगलाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणी एकांतात बसल्याचे दिसत आहे. यावेळी काही तरुण  व्हिडिओ बनवत तेथे पोहोचले आणि मुलगा आणि मुलीला धमकावू लागले. यावेळी नराधमांनी मुलीचा विनयभंगही केला. 

दोघांनीही व्हिडिओ न काढण्याची मागणी केली, आम्ही पाहिजे ते देतो मात्र व्हिडिओ काढून बदनामी करु  नका, अशी विनंती ते करतात.यावेळी त्यांच्याकडून पैसे घेण्यात आल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे, कुठला आहे, कोणी बनवला आहे, तरुण-तरुणी कोण आहेत, त्यांना धमक्या कोण देत आहेत, पैसे घेणारे कोण आहेत, यासारख्या गोष्टी अद्याप समोर आलेल्या नाहीत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आरोपी आणि पीडितेचा शोध घेत आहेत.

(नक्की वाचा-  Success story: आधी नापास झाला मग यशाचा मानकरी ठरला! शेतकऱ्याच्या लेकानं काय केलं?)

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक रीवा विवेक सिंह यांनी माहिती दिली आहे. पीडित मुलगी आमच्यासमोर आल्यास आम्ही त्यांची ओळख कोणत्याही परिस्थितीत उघड करणार नाही. पीडितांना मदत करणे आणि गुन्हेगारांना तुरुंगात टाकणे हे पोलिसांचे काम आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसपींनी सेमरिया, सिरमौर, बैकुंठपूर, गढ पोलिस स्टेशनला या व्हिडिओची माहिती गोळा करून आरोपींना अटक करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. 

(नक्की वाचा-  Success story: आधी नापास झाला मग यशाचा मानकरी ठरला! शेतकऱ्याच्या लेकानं काय केलं?)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com