जाहिरात

Shockingn News: माणुसकी संपली! पती रक्ताच्या थारोळ्यात, चालकाने पत्नीकडून साफ करवून घेतली अ‍ॅम्बुलन्स

मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका जखमी रुग्णाच्या पत्नीला '108' रुग्णवाहिकेची साफसफाई करण्यास भाग पाडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Shockingn News: माणुसकी संपली! पती रक्ताच्या थारोळ्यात, चालकाने पत्नीकडून साफ करवून घेतली अ‍ॅम्बुलन्स

मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या पतीला रुग्णालयात आणल्यानंतर, त्याच्या रक्ताने माखलेली रुग्णवाहिका (Ambulance) चक्क त्याच्या पत्नीलाच धुवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

काय आहे नेमकी घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, कारेला गावातील राहुल बर्मन हा तरुण रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी '108' रुग्णवाहिकेतून कटनी जिल्हा रुग्णालयात आणले गेले. राहुलच्या जखमांमुळे रुग्णवाहिकेच्या आत रक्ताचे डाग पडले होते. ड्युटीवर असलेला ईएमटी (Emergency Medical Technician) मोहित खटीक याने राहुलची पत्नी प्रमिला बर्मन हिला रुग्णवाहिका साफ करण्यास सांगितले. पतीच्या जिवाच्या काळजीपोटी प्रमिला यांनी रुग्णवाहिका धुतली. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी या प्रकाराचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.

(नक्की वाचा-  Chandrapur News: चंद्रपूर हादरलं! मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांसोबत भयंकर घडलं; रुग्णालय सील)

प्रशासकीय कारवाईचा बडगा 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कटनीचे जिल्हाधिकारी आशीष तिवारी यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत आरोग्य विभागाने खालील कारवाई केली.  रुग्णवाहिका चालवणारी कंपनी 'JAES Projects Pvt Ltd' ने पायलट देवा साहू आणि ईएमटी मोहित खटीक या दोघांना तात्काळ कामावरून काढून टाकले आहे. 

आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण

आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, रुग्णवाहिकेची स्वच्छता राखणे ही संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, रुग्णाच्या नातेवाईकांची नाही. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यात येईल आणि कडक नियमावली लागू केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com