जाहिरात

माजी पंतप्रधानांचा नातू, माजी मुख्यमंत्र्यांचा लेक, बलात्कार प्रकरणात दोषी ठरला, कोर्टात ढसाढसा रडला

रेवण्णा याने त्यांच्या फार्महाऊसमध्ये काम करणाऱ्या एका मोलकरणीवर बलात्कार केला होता.

माजी पंतप्रधानांचा नातू, माजी मुख्यमंत्र्यांचा लेक, बलात्कार प्रकरणात दोषी ठरला, कोर्टात ढसाढसा रडला

Prajwal Revanna: जनता दल सेक्युलरचे नेते आणि कर्नाटकातील हासन मतदारसंघाचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना न्यायालयाने दणका दिला आहे. महिलांचे लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणात रेवण्णा यांना दोषी ठरवण्यात आले आहे. कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्याचे कळताच रेवण्णा कोर्टामध्ये ढसा ढसा रडायला लागले. कोर्टातून बाहेर पडते वेळी रेवण्णा रडताना दिसले होते. कोर्टात उपस्थित लोकांनी सांगितले की कोर्टाचा हा निर्णय त्यांच्यासाठी अनपेक्षित होता. रेवण्णा यांना दोषी ठरविण्यात आले असून आता त्यांना शिक्षा काय होते याकडे लक्ष लागले आहे. यासाठी फार वाट पाहावी लागणार नसून शिक्षेचा फैसला उद्याच म्हणजे 2 ऑगस्ट रोजी आहे. 

रेवण्णा यांचे आजोबा एच.डी.देवेगौडा हे भारताचे माजी पंतप्रधान असून त्यांचे वडील एचडी कुमारस्वामी हे कर्नाटकचे  मुख्यमंत्री होते. या दोघांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात प्रवेश करणाऱ्या रेवण्णा हे हासन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. रेवण्णा गेल्या 14 महिन्यांपासून तुरुंगात असून त्यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आणि बलात्काराचे आरोप केले होते. सोशल मीडियावर रेवण्णा यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती. यानंतर त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आणि त्यांना अटक करण्यात आली. 

नक्की वाचा - Malegaon Bomb Blast Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, कुणीच दोषी नसेल तर 6 जणांना कुणी मारलं? : प्रकाश आंबेडकर

कोर्टाने 26 साक्षीदार, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे रेवण्णा यांना दोषी ठरवले. संतोष भट यांच्या न्यायालयाने त्यांना दोषी घोषित केले.  अवघ्या 14 महिन्यांत या केसचा निकाल लावण्यात पोलीस आणि सरकारी वकिलांना यश आले आहे हे विशेष. कारण अशी प्रकरणे अनेक महिने रेंगाळत, मात्र हे प्रकरण त्याला अपवाद ठरले आहे. प्रज्वलच्या वकिलांनी त्याला जामीन मिळावा यासाठी बरेच हातपाय मारून पाहिले. मात्र त्यांना एकदाही यश आले नाही. रेवण्णा हा राजकीय प्रभाव असलेल्या कुटुंबाचा सदस्य असून तो जामिनावर सुटला तर पीडीत तसेच साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो. त्यामुळे त्याला जामीन नाकारण्यात आला. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही त्याच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आले. मात्र तिथेही रेवण्णाच्या वकिलांना यश मिळाले नाही. 

नक्की वाचा - karnataka News: 24 घर, 40 एकर शेती, एक किलो सोनं.. फक्त 15,000 पगारी क्लर्ककडे 30 कोटींचं घबाड

मोलकरणीवरही केला बलात्कार
रेवण्णा याने त्यांच्या फार्महाऊसमध्ये काम करणाऱ्या एका मोलकरणीवर बलात्कार केला होता. कोविड असताना त्याने या मोलकरणीवर अत्याचार सुरू केले होते. रेवण्णा याने या मोलकरणीचे व्हिडीओ देखील काढले होते. त्याद्वारे ब्लॅकमेल करत  त्याने मोलकरणीवर अनेकदा बलात्कार केला असा आरोप आहे. 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर रेवण्णा फरार झाला होता, मात्र नंतर तो पोलिसांना शरण आला होता.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com