जाहिरात

Malegaon Bomb Blast Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, कुणीच दोषी नसेल तर 6 जणांना कुणी मारलं? : प्रकाश आंबेडकर

जर एटीएसकडे बनावट पुरावे असतील, तर एनआयए न्यायालयाने दोषपूर्ण तपासासाठी अधिकाऱ्यांना जबाबदार का ठरवले नाही आणि विभागीय चौकशीचे आदेश का दिले नाहीत? या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

Malegaon Bomb Blast Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, कुणीच दोषी नसेल तर 6 जणांना कुणी मारलं? : प्रकाश आंबेडकर

2008 मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एनआयए आणि इतर तपास यंत्रणांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. "जर या प्रकरणात कोणताही दोषी नसेल, तर सहा नागरिकांचा बळी नेमका कोणी घेतला?" असा थेट सवाल त्यांनी केला आहे. 'एक्स' या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

एनआयएने तपासात आपली भूमिका का बदलली? जोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, तोपर्यंत सत्य कधीच बाहेर येणार नाही! दिवंगत आयपीएस हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखालील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सुरू केलेल्या तपासाचे कागदपत्रे कुठे आहेत अस्तित्वात असलेल्या सिद्धांताचा वापर केला जात असताना त्यांनी नवीन तपास का सुरू केला हे एनआयए स्पष्ट करू शकेल का? असा सवाल प्रकाश आंबेडक यांनी उपस्थित केला आहे.

(नक्की वाचा- VIDEO: हे वागणं बरं नव्हं! नवी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं मंत्र्यांसमोर लोटांगण)

आरोपींमधील अनेक बैठकींबद्दल माहिती असलेल्या काही सेवारत लष्करी अधिकाऱ्यांसह बहुतेक साक्षीदार अखेर न्यायालयात का उलटले? जर हे साक्षीदार सुरुवातीला खोटे बोलत असतील, तर सरकारी वकिलांनी त्यांच्यापैकी कोणावरही खोटी साक्ष दिल्याचा आरोप का दाखल केला नाही?, असे गंभीर प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

ते म्हणाले की, जर एटीएसकडे बनावट पुरावे असतील, तर एनआयए न्यायालयाने दोषपूर्ण तपासासाठी अधिकाऱ्यांना जबाबदार का ठरवले नाही आणि विभागीय चौकशीचे आदेश का दिले नाहीत? या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत! अन्यथा, पूर्वीच्या मनु कायद्याप्रमाणे, कोणत्याही ब्राह्मणाला दोषी ठरवले जाणार नाही? अन्यथा, आरएसएस आणि त्याच्याशी संबंधित सदस्यांना कधीही दोषी ठरवले जाणार नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

(नक्की वाचा-  'अरे पिसाळलेल्या XX', 'वंचित' कडून जितेंद्र आव्हाडांना आर्वाच्च भाषेत शिवीगाळ का? वाचा Inside Story)

मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता व अनेक जण जखमी झाले. सुरुवातीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली तपास करत काही हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित आरोपींना अटक केली होती. मात्र, 2011 मध्ये तपास एनआयएकडे गेल्यानंतर काही वर्षांनी त्याने आपली दिशा बदलली आणि अनेक आरोपींना क्लीन चिट दिली.

या प्रकरणात 15 वर्षांनंतरही सत्य बाहेर आलेले नाही. अनेक साक्षीदार पलटले, आरोप बदलले गेले, आणि तपास संस्थांनी आपली भूमिका सतत बदलल्याने जनतेच्या मनात संशयाची जागा निर्माण झाली आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com