जाहिरात

52 वेळा सॉरी म्हणाला, पण शाळेने दया दाखवली नाही; 13 वर्षांच्या विद्यार्थ्याने 8 व्या मजल्यावरुन मारली उडी

एका आठवीतील विद्यार्थ्याने शुक्रवारी रतलाममधील डोंगरे नगर स्थित खासगी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून स्वत:चाच जीव घेण्याचा प्रयत्न केला.

52 वेळा सॉरी म्हणाला, पण शाळेने दया दाखवली नाही; 13 वर्षांच्या विद्यार्थ्याने 8 व्या मजल्यावरुन मारली उडी

School Student : मध्य प्रदेशातून एक अत्यंत हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका आठवीतील विद्यार्थ्याने शुक्रवारी रतलाममधील डोंगरे नगर स्थित खासगी शाळेच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारून स्वत:चाच जीव घेण्याचा प्रयत्न केला. हा विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील स्केटिंग खेळतो. तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्यामुळे विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. 

विद्यार्थ्यासोबत नेमकं काय घडलं? 

शाळेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी विद्यार्थ्याने मोबाइल फोन शाळेत आणला होता. त्याने वर्गाचं शूटिंग केलं होतं. जो व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर अपलोड केला. शाळा व्यवस्थापनाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी मुलाच्या आई-वडिलांना शाळेत बोलावलं. शाळेच्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये १३ वर्षीय विद्यार्थी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात प्रवेश करताना दिसत आहे. त्याने ५२ वेळा तरी सॉरी म्हणत चुकीची माफी मागितली. 

विद्यार्थ्याने सांगितलं की, मुख्याध्यापकांनी कथितपणे त्याचं करिअर संपवणं, त्याला निलंबित करण्याची धमकी दिली. स्केटिंगमध्ये मिळालेली पदकंही काढून घेण्याचा इशारा दिला. यानंतर विद्यार्थी हताश झाला. काही वेळानंतर तो कार्यालयाच्या बाहेर आला आणि धावत तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. 

Shocking! रॉयल लग्नात रॅपिडो ड्रायव्हरने खर्च केले 331 कोटी? ED ला लागली खबर अन्....

नक्की वाचा - Shocking! रॉयल लग्नात रॅपिडो ड्रायव्हरने खर्च केले 331 कोटी? ED ला लागली खबर अन्....

विद्यार्थ्याचे वडील शाळेतच होते...

हैराण करणारी बाब म्हणजे विद्यार्थ्याचे वडील त्यावेळी शाळेतच होते. ते वेटिंग रूममध्ये मुलाची वाट पाहत होते. शाळेकडून त्यांना बोलावण्यात आलं होतं. मुलाने अशा प्रकारचं पाऊल उचलल्यानं त्यांना धक्का बसला आहे. मुलगा हुशार आहे. तो राष्ट्रीय स्तरावर स्केटिंग खेळला आहे. आठवीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने वर्गात मोबाइल आणला होता आणि वर्गाचा व्हिडिओ शूट केला होता.  

हेल्पलाइन

वांद्रेवाला फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ - ९९९९६६६५५५ किंवा help@vandrevalafoundation.com

TISS आयकॉल ०२२-२५५२११११ (सोमवार ते शनिवार - सकाळी ८:०० ते रात्री १०:०० पर्यंत उपलब्ध)

(जर तुम्हाला मदत हवी असेल किंवा मदतीची गरज असलेल्या एखाद्या व्यक्तीला माहिती हवी असेल तर कृपया तुमच्या जवळच्या मानसिक आरोग्य व्यावसायिकांशी संपर्क साधा.)


 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com