जाहिरात
This Article is From Apr 24, 2024

वीजबिल जास्त आलं म्हणून MSEBच्या महिला कर्मचाऱ्याची कोयत्याने वार करुन हत्या, बारामतीतील घटना

रिंकू थिटे असं महावितरणच्या मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. अभिजित पोते असं आरोपीचं नाव आहे. 

वीजबिल जास्त आलं म्हणून MSEBच्या महिला कर्मचाऱ्याची कोयत्याने वार करुन हत्या, बारामतीतील घटना

जितेंद्र जाधव, बारामती

महावितरणच्या महिला टेक्निशियनची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बारामती तालुक्यातील मोरगाव येथील ही घटना आहे. लाईट बिल जास्त येत आहे, अशी तक्रार करून दखल न घेतल्याने आरोपीने हे कृत्य केलं. रिंकू थिटे असं महावितरणच्या मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. अभिजित पोते असं आरोपीचं नाव आहे. 

नक्की वाचा- बहिणीला लग्नात सोन्याची अंगठी देण्याची भावाची इच्छा अपूर्ण; रागावलेल्या पत्नीने जीवच घेतला!

५७० रुपयांसाठी घेतली जीव

वीजबिल जास्त येतं या अनेकांच्या तक्रारी असतात. मात्र बारामतीतील या घटनेने खळबळ उडाली आहे. वीजबिल जास्त येत आहे, अशी तक्रार अभिजीत पोते याची होती. याबाबत त्याने महावितरणकडे तक्रार देखील केली होती. पोते यांच्या घराचं बिल एप्रिल महिन्यात ५७० रुपये आल्याने तो संतापला होता. मात्र उन्हाळा आल्याने वीज वापरात वाढ झाल्याने वीजबिल वाढलं असेल, असंही कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. मात्र आरोपीला हे मान्य नव्हते.  

नक्की वाचा - सख्खा शेजारी पक्का वैरी! क्षुल्लक वादाचा असा घेतला बदला की संपूर्ण सोसायटी हादरली

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी महावितरणच्या मोरगाव येथील कार्यालयात त्या एकट्याच होत्या. अभिजीत पोटे कार्यालयात आला आणि बिल जास्त का येत आहे, यासाठी मीटर रीडिंग तपासावे, मागणी पुन्हा एकदा केली. मात्र सतत तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नव्हती.  त्यामुळे चिडलेल्या अभिजीत पोतेने रिंकू थिंटे यांच्यावर हल्ला केला. अभिजीतने रिंकू यांच्यावर कोयत्याने जवळपास १६ वार केले वार केले.

या हल्ल्यात रिंकू गंभीर जखमी झाल्या होत्या. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तसेच या घटनेचा निषेधही नोंदवला जात आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: