जाहिरात

Ambernath News : लोकलचा आणखी एक बळी, अंबरनाथमध्ये लोकल अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जीवनवाहिनी ठरणारी ही लोकल कधी एखाद्याचा जीव घेईल काही सांगता येत नाही. 

Ambernath News :  लोकलचा आणखी एक बळी, अंबरनाथमध्ये लोकल अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Mumbai Local Accident : उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना दररोज अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागतं. लोकलमधील वाढती गर्दी या गंभीर प्रश्नाला प्रवासी गेल्या अनेक वर्षांपासून तोंड देत आहे. दररोज उभं राहून प्रवास करणं शक्य नसल्याने धावती लोकल उडी मारून पकडण्याशिवाय गत्यंतर नसतं. अशातच जीवनवाहिनी ठरणारी ही लोकल कधी एखाद्याचा जीव घेईल काही सांगता येत नाही. 

तीन दिवसांपूर्वी अंबरनाथहून उल्हासनगरच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून रोहित मगर या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर अंबरनाथमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काही दिवसांपूर्वी अंबरनाथ रेल्वे स्थानकावर असाच एक धक्कादायक प्रकार घडला. लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये अडकला गेला होता. यानंतर त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र दुर्दैवाने त्याचा जीव वाचू शकला नाही आणि या अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट, यादीत तुमच्या परिसराचे नाव आहे का? पाहा संपूर्ण यादी

नक्की वाचा - महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट, यादीत तुमच्या परिसराचे नाव आहे का? पाहा संपूर्ण यादी

रोहित बच्चेलाल यादव असं या 34 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. तो उल्हासनगरच्या लालचक्की भागातील शिवसैनिक बच्चेलाल यादव यांचा मुलगा. काही महिन्यांपूर्वीच तो अंबरनाथला राहायला आला होता. सकाळी कामावर जाण्यासाठी 7 वाजून 51 मिनिटांची लोकल पकडताना त्याचा अपघात झाला. यात जखमी झालेल्या रोहितला मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यान त्याने जीव सोडला. या अपघातानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: