
Transformation of 132 Railway Stations in Maharashtra: भारतीय रेल्वेच्या "अमृत भारत स्टेशन" योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्रीय मंत्री श्री.वैष्णव यांचे आभार देखील मानले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थानके म्हणजे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी, टिळक टर्मिनस, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, अमरावती, भुसावळ, इत्यादी. तसेच, उपनगरीय आणि ग्रामीण भागातील अनेक स्थानकांनाही यात स्थान देण्यात आले आहे, जसे की – अकलकोट रोड, दौंड, इगतपुरी, चांदा फोर्ट, मालाड, डोंबिवली, चिंचवड इत्यादींचा समोवश आहे.
(नक्की वाचा: Circuit train: गडकिल्ल्यांना जोडणारी आयकॉनिक रेल्वे टूर, फडणवीसांसह रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा)
या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.
(नक्की वाचा: Orange Gate–Marine Drive Twin Tunnel Project: मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार, या दुहेरी बोगद्याचं काम लवकरच होणार सुरू)
या पुनर्विकासात स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे.
- अजनी स्टेशन 297.8 कोटी रुपये
- नागपूर जं. 589 कोटी रुपये
- नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जं. 17.4 कोटी कोटी रुपये
- जालना 189 कोटी रुपये
- छत्रपती संभाजीनगर 241 कोटी रुपये
- रोटेगाव 12 कोटी रुपये
- अहिल्यानगर 31 कोटी रुपये
- भायखळा 35.5 कोटी रुपये
- चिंचपोकळी 52 कोटी रुपये
- चर्नी रोड 23 कोटी रुपये
- छत्रपती शिवाजी महाराज टमिनल 1813 कोटी रुपये
- ग्रँट रोड 27 कोटी रुपये
- लोअर परेल 30 कोटी रुपये
- मरिन लाइन्स 27.7 कोटी रुपये
- सॅण्डहर्स्ट रोड 16.4 कोटी रुपये
- मुर्तिजापूर स्टेशन 13 कोटी रुपये
- बडनेरा 36.3 कोटी रुपये
- बारामती 11.4 कोटी रुपये
- दौंड 44 कोटी रुपये
- केडगाव 12.5 कोटी रुपये
- परळी वैजनाथ 25.7 कोटी रुपये
- भंडारा रोड 7.7 कोटी रुपये
- गोंदिया 40 कोटी रुपये
- तुमसर रोड 11 कोटी रुपये
- टिटवाळा 25 कोटी रुपये
- शेगाव 29 कोटी रुपये
- बल्लारशाह 31.4 कोटी रुपये
- चंद्रपूर 25.5 कोटी रुपये
- चांदा फोर्ट 19.3 कोटी रुपये
- धुळे 9.5 कोटी रुपये
- लासलगाव 10.5 कोटी रुपये
- मनमाड 45 कोटी रुपये
- नगरसोल 20.3 कोटी रुपये
- नांदगाव 20 कोटी रुपये
- आमगाव 7.8 कोटी रुपये
- वडसा 20.5 कोटी रुपये
- हातकंणगले 6 कोटी रुपये
- हिमायतनगर 43 कोटी रुपये
- हिंगोली डेक्कन 21.5 कोटी रुपये
- किनवट 23 कोटी रुपये
- चाळीसगाव 35 कोटी रुपये
- अंमळनेर 29 कोटी रुपये
- धरणगाव 26 कोटी रुपये
- पाचोरा जं. 28 कोटी रुपये
- दिवा 45 कोटी रुपये
- मुंब्रा 15 कोटी रुपये
- शहाड 8.4 कोटी रुपये
- कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराज टर्मिनस 43 कोटी रुपये
- लातूर 19 कोटी रुपये
- जेऊर 20 कोटी रुपये
- कुर्डूवाडी जं 20 कोटी रुपये
- फलटण 1 कोटी रुपये
- वाठर 8 कोटी रुपये
- आकुर्डी 34 कोटी रुपये
- चिंचवड 20.4 कोटी रुपये
- देहू रोड स्टेशन 8.05 कोटी रुपये
- तळेगाव स्टेशन 40.34 कोटी रुपये
- मालाड स्टेशन 12.32 कोटी रुपये
- कुर्ला जं. स्टेशन 28.81 कोटी रुपये
- कांजुरमार्ग स्टेशन 27 कोटी रुपये
- विद्याविहार स्टेशन 32.8 कोटी रुपये
- विक्रोळी स्टेशन 19 कोटी रुपये
- जोगेश्वरी स्टेशन 119 कोटी रुपये
- माटुंगा स्टेशन 17.3 कोटी रुपये
- परळ स्टेशन 19.4 कोटी रुपये
- प्रभादेवी 21 कोटी रुपये
- वडाळा स्टेशन 23 कोटी रुपये
- भोकर स्टेशन 11.3 कोटी रुपये
- धर्माबाद स्टेशन 30 कोटी रुपये
- मुखेड जं.स्टेशन 23 कोटी रुपये
- उमरी स्टेशन 8 कोटी रुपये
- देवळाली स्टेशन 10.5 कोटी रुपये
- इगतपुरी स्टेशन 12.5 कोटी रुपये
- धाराशिव स्टेशन 22 कोटी रुपये
- गंगाखेड स्टेशन 16 कोटी रुपये
- मनवथ रोड स्टेशन 12 कोटी रुपये
- परभणी जं. स्टेशन 26 कोटी रुपये
- परतूर स्टेशन 23 कोटी रुपये रुपये
- पूर्णा जं. स्टेशन 24 कोटी रुपये
- सेलू स्टेशन 23.2 कोटी रुपये
- हडपसर स्टेशन 25 कोटी रुपये
- गोधनी स्टेशन 29 कोटी रुपये
- काटोल स्टेशन 23.3 कोटी रुपये
- कामठी स्टेशन 7.7 कोटी रुपये
- नरखेड जं. स्टेशन 37.6 कोटी रुपये
- कराड स्टेशन 12.5 कोटी रुपये
- सांगली स्टेशन 24.2 कोटी रुपये
- लोणंद जं.स्टेशन 10.5 कोटी रुपये
- सातारा स्टेशन 34.3 कोटी रुपये
- बेलापूर स्टेशन 32 कोटी रुपये
- कोपरगाव स्टेशन 30 कोटी रुपये
- सेवाग्राम स्टेशन 18 कोटी रुपये
- धामणगाव स्टेशन 18 कोटी रुपये
- हिंगणघाट स्टेशन 22 कोटी रुपये
- पुलगाव स्टेशन 16.5 कोटी रुपये
- उरूली स्टेशन 13 कोटी रुपये
- वाशिम स्टेशन 20.3 कोटी रुपये
- मलकापूर स्टेशन 19 कोटी रुपये
- नांदुरा स्टेशन 10.6 कोटी रुपये
- रावेर स्टेशन 9.2 कोटी रुपये
- सावदा स्टेशन 8.5 कोटी रुपये
- दुधनी स्टेशन 22 कोटी रुपये
- पंढरपूर स्टेशन 40 कोटी रुपये
- सोलापूर स्टेशन 56 कोटी रुपये
- नंदूरबार स्टेशन 15 कोटी रुपये
- पालघर स्टेशन 17.5 कोटी रुपये
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world