- ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Mumbai Local Murder News: पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादात मयंक लोहार या 22 वर्षीय तरूणावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या धक्कादायक घटनेनंतर रेल्वे प्रशासन, आरपीएफ (RPF), जीआरपी (GRP) आणि वैद्यकीय पथकाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी तातडीने मदत केली. 23 जून रोजी ट्रेन क्रमांक 90663 या फास्ट लोकलमध्ये चर्चगेट स्टेशन ते नालासोपारा स्टेशनदरम्यान नेमकं काय-काय घडलं? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
मुंबई लोकल हत्येचा थरकाप उडवणारा घटनाक्रम| Mumbai Local Murder Case Timeline
रात्री 10:05 वाजता - ट्रेन क्रमांक 90663 चर्चगेट स्टेशनवरून सुटली.
रात्री 10:42 वाजता - लोकल अंधेरी स्टेशनवर पोहोचली. यावेळी मृत प्रवासी मयंक लोहार आणि आरोपी दोघेही एकाच फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करत होते.
अंधेरी ते बोरीवली स्टेशनदरम्यान - मुसळधार पाऊस सुरू असल्याने डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान आरोपीने मयंकच्या पोटात चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले.
रात्री 11:04 वाजता - लोकल बोरीवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आली. ट्रेन पूर्ण थांबण्यापूर्वीच आरोपीने तिथून पळ काढला.
रात्री 11:07 वाजता - ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर अवघ्या 3 मिनिटांच्या आत जीआरपी आणि आरपीएफचे जवान जखमी प्रवाशाच्या मदतीसाठी डब्यात पोहोचले.
रात्री 11:10 वाजता - स्ट्रेचर, हमाल आणि वैद्यकीय मदत पथक डब्यापाशी दाखल झाले.
रात्री 11:12 वाजता - जखमी मयंक लोहारला डब्यातून बाहेर काढून उपचारांसाठी हलवण्यात आले.
रात्री 11:22 वाजता - जखमी प्रवाशाला बोरीवली स्टेशनवरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात (EMR) आणले गेले आणि डॉक्टरांनी त्याची तपासणी सुरू केली.
रात्री 11:22 ते रात्री 11:42 वाजेदरम्यान - रेल्वे कर्मचारी, आरपीएफ, जीआरपी आणि स्टेशन अधिकाऱ्यांनी मयंकला मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी रुग्णवाहिकेची आणि इतर वैद्यकीय व्यवस्थेची तयारी केली.
रात्री 11:42 वाजता - ईएमआर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मयंकला रुग्णवाहिका क्रमांक MH-02-CE-9996 मधून कांदिवली येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. प्रवासादरम्यान जीआरपी आणि आरपीएफचे जवान रुग्णासोबत होते.
रात्री 11:52 वाजता - रुग्णवाहिका शताब्दी रुग्णालयात पोहोचली.
मध्यरात्री 1:00 वाजता - मुंबई सेंट्रलचे एडीआरएम आणि मुंबई सेंट्रलचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांनी स्वतः बोरीवली स्टेशनला भेट देऊन या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.
(नक्की वाचा : Mumbai Local Murder CCTV: मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित राडा, दरवाजाच्या वादातून प्रवाशाचा खून करणारा आरोपी CCTV कैद)
पश्चिम रेल्वेची तत्काळ मदत (Western Railway Response)
या गंभीर घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे आपत्कालीन पथक तत्काळ सक्रिय झाले होते. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच अवघ्या काही मिनिटांत सुरक्षा जवान आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले. प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी कोणतीही दिरंगाई न करता अवघ्या 38 मिनिटांच्या आत त्याला स्टेशनवरून रुग्णवाहिकेने शताब्दी रुग्णालयात रवाना करण्यात आले.
(नक्की वाचा : Mumbai Local Murder: मुंबई लोकल रक्ताने माखली! दरवाजा बंद करण्यावरून रक्तरंजित राडा, प्रवाशावर चाकूने सपासप वार)
तपास यंत्रणांकडून पुढील कारवाई (Current Status and Investigation)
तपास यंत्रणांनी घटनेनंतर तत्काळ स्टेशनवरील आणि लोकलचे सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले असून ते पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास शासकीय रेल्वे पोलीस (GRP) करत असून फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात आहेत. पुढील तपासात या घटनेचे अधिक तपशील समोर येतील.
Mumbai Local Train Murder । सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईत हे काय घडलं? लोकलमध्ये प्रवाशाची हत्या
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world