जाहिरात

Mumbai News: डाव उलटला! वसुलीसाठी बुरखा घालणं अंगलट आलं, मुलं पळवणारा समजून लोकांनी चोपलं, धक्कादायक कारण उघड

Mumbai News: बुरखा घालून वेशांतर करणं एका रिक्षा चालकाच्या अंगाशी आलंय, जमावाने त्याला बेदम मारहाण केली. नेमकं काय आहे प्रकरण?

Mumbai News: डाव उलटला! वसुलीसाठी बुरखा घालणं अंगलट आलं, मुलं पळवणारा समजून लोकांनी चोपलं, धक्कादायक कारण उघड
"Mob Thrashes Auto Driver: पार्कसाइटमध्ये रिक्षाचालकासोबत नेमकं काय घडलं?"
Canva

Mumbai News: बुरखा घालणं मुंबईतील एका रिक्षाचालकाच्या चांगलंच अंगलट आलंय. तीन प्रवाशांनी भाडे न दिल्याने वैतागलेल्या एका रिक्षा चालकाने वसुली करण्यासाठी बुरखा घालून वेश बदलण्याचा निर्णय घेतला. पण त्याची कल्पना काहीच कामी आली नाही. कारण स्थानिकांनी त्याला मुलं पळवणारा समजून चोप दिलाय. सोमवारी (22 डिसेंबर) विक्रोळीतील पार्कसाइट परिसरात ही घटना घडलीय. 

रिक्षाचे भाडे न देताच पसार झाले प्रवासी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी तौसीफ मोहम्मद शेखने आपल्या रिक्षातून तीन प्रवाशांना पार्कसाइट येथे पोहोचवलं होतं. पण किरकोळ वाद झाल्यानं तीनही प्रवासी भाडे न देताचे पसार झाले.

तीनही प्रवाशांकडून भाडे वसूल करण्याचे शेखनं पक्क केलं आणि बुरखा घालून त्याने वेश बदलला. पण हा डाव त्याच्यावरच उलटला. स्थानिकांना शेखवर शंका आली आणि त्याने परिधान केलेली जीन्स तसेच चपलांवर खरी ओळख समोर आली. 

Nagpur News: महिला पोलिसासोबत लव्ह, सेक्स, धोका! विवाहित पुरुषाने लाखो उकळले, लग्नाबद्दल विचारताच किन्नरांकडून हत्येची धमकी

(नक्की वाचा: Nagpur News: महिला पोलिसासोबत लव्ह, सेक्स, धोका! विवाहित पुरुषाने लाखो उकळले, लग्नाबद्दल विचारताच किन्नरांकडून हत्येची धमकी)

स्थानिकांनी रिक्षा चालकाला दिला चोप

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पार्कसाइट परिसरात एका मशीदजवळ लोक जमले आणि त्यांनी शेखला बेदम चोप दिला. त्यावेळेस शेख नशेत असल्याचंही म्हटलं जातंय. शेख मुलं चोरणारा व्यक्ती आहे, अशी लोकांना शंका आली. जमावाच्या तावडीतून सोडवून पोलिसांनी शेखला पोलीस ठाण्यात आणलं. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Navi Mumbai: Navi Mumbai: टीप मिळाली, तो इशारा मिळताच पोलिसांनी लॉजवरचा वेश्या व्यवसाय उधळला; 1 अल्पवयीनसह 6 महिलांची सुटका

(नक्की वाचा: Navi Mumbai: टीप मिळाली, तो इशारा मिळताच पोलिसांनी लॉजवरचा वेश्या व्यवसाय उधळला; 1 अल्पवयीनसह 6 महिलांची सुटका)

(Content Source: PTI)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com