जाहिरात

Navi Mumbai: टीप मिळाली, तो इशारा मिळताच पोलिसांनी लॉजवरचा वेश्या व्यवसाय उधळला; 1 अल्पवयीनसह 6 महिलांची सुटका

Navi Mumbai News: नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळोजा एमआयडीसी परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवसाय उधळला. मोठी कारवाई केली.

Navi Mumbai: टीप मिळाली, तो इशारा मिळताच पोलिसांनी लॉजवरचा वेश्या व्यवसाय उधळला; 1 अल्पवयीनसह 6 महिलांची सुटका
"Navi Mumbai News: नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई"
प्रतिकात्मक फोटो (Canva)

- राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai News:
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळोजा एमआयडीसी परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवसाय उधळला. या कारवाईमध्ये पोलिसांनी एक अल्पवयीन बांग्लादेशी पीडित मुलीसह सहा महिलांची सुटका केलीय. अनैतिक मानवी वाहतूक करणाऱ्या रॅकेटविरोधात मोठी कारवाई करण्यात आलीय.  

कधी करण्यात आली कारवाई?

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना वेश्या व्यवसायाबाबत माहिती मिळाली होती. माहितीनुसार 21 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 11.58 वाजता हॉटेल नवनाथ इन लॉजिंगवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत अल्पवयीन मुलीसह सहा महिलांची सुटका केली गेलीय. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलीय तसेच तळोजा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आठ लग्न केलेल्या मामेभावाशी जबरदस्तीने लग्न, मग सतत बलात्कार... अंडरवर्ल्ड डॉनची लेक PM मोदींकडे मदत मागतेय

(नक्की वाचा: आठ लग्न केलेल्या मामेभावाशी जबरदस्तीने लग्न, मग सतत बलात्कार... अंडरवर्ल्ड डॉनची लेक PM मोदींकडे मदत मागतेय)

गुप्त माहितीनुसार कारवाई

लॉज मॅनेजर ग्राहकांकडून दोन हजार रुपये घेऊन महिलांना रूममध्ये दाखवून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती समोर आली होती. माहितीची खात्री करण्यासाठी लॉजवर बनावट ग्राहक पाठवण्यात आला. सांकेतिक इशारा मिळताच पोलीस पथकाने लॉजवर छापा टाकला.

Nagpur News: महिला पोलिसासोबत लव्ह, सेक्स, धोका! विवाहित पुरुषाने लाखो उकळले, लग्नाबद्दल विचारताच किन्नरांकडून हत्येची धमकी

(नक्की वाचा: Nagpur News: महिला पोलिसासोबत लव्ह, सेक्स, धोका! विवाहित पुरुषाने लाखो उकळले, लग्नाबद्दल विचारताच किन्नरांकडून हत्येची धमकी)

कोणाकोणाला अटक करण्यात आलीय?

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लॉज चालक, मॅनेजर आणि सर्व्हिस बॉयचा समावेश आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी रोखरक्कम, DVR, मोबाइल फोन, नोंद वही (रजिस्टर) सह अन्य गोष्टी जप्त केल्या आहेत. या कारवाईत अल्पवयीन पीडितेची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवण्यात आलीय. सुटका केलेल्या महिलांची आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि संरक्षणात्मक मदतीसाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे. प्रकरणाचा अधिक तपास तळोजा एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com