जाहिरात

डोक्यात अडकलेला कोयता घेऊन रुग्णालयात फिरत होता तरुण; भीषण दृश्य पाहून रुग्णांसह नातेवाईकांमध्ये घबराट

मुंबईतील शीव रुग्णालयाच्या आयसीयूच्या बाहेर डोक्यात अक्षरश: कोयता  खुपसलेल्या अवस्थेत एक व्यक्ती फिरताना दिसत आहे.

डोक्यात अडकलेला कोयता घेऊन रुग्णालयात फिरत होता तरुण; भीषण दृश्य पाहून रुग्णांसह नातेवाईकांमध्ये घबराट

रिझवान शेख, प्रतिनिधी

Mumbai News : मुंबईतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील शीव रुग्णालयाच्या आयसीयूच्या बाहेर डोक्यात अक्षरश: कोयता  खुपसलेल्या अवस्थेत एक व्यक्ती फिरताना दिसत आहे. तो मोबाइलमध्ये टाइप करतानाही दिसत आहे. या प्रकरणात उपचारादरम्यान निष्काळजीपणाचा आरोप केला जात आहे. 

मुंबईतील रुग्णालयात हैराण करणारी घटना...

मुंबईतून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. ज्यामुळे रुग्णालय परिसरातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या आयसीयूच्या बाहेर एक व्यक्ती डोक्यात कोयता खुपसलेल्या अवस्थेत फिरत असल्याचं दिसत आहे. हे भयानक दृश्य पाहून तेथील लोकांमध्ये खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तो तरुण गंभीर जखमी होता. मात्र काही वेळापर्यंत त्याला तातडीने उपचार मिळाले नाही. तो तरुण आयसीयूच्या बाहेर फिरत होता. तो तरुण उपचारासाठी रुग्णालयात आला होता. मात्र कोणत्याही डॉक्टरांनी त्याला आपत्कालिन केस म्हणून दाखल करून घेतलं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. 

नक्की वाचा - Thane News : 'तो' रात्रीच्या अंधारात दारासमोरच उभा... रहिवाशांची तंतरली; घराबाहेर पडायचं कसं?

रुग्णालय प्रशासनाकडून दुर्लक्ष?

घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमी व्यक्तीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे आणि डॉक्टर त्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणानंतर रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, त्याच्यावर तातडीने उपचार दिले असते तर परिस्थिती इतकी गंभीर झाली नसती.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com